यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त बघा, देशभक्तीवर आधारित गाजलेले ५ चित्रपट

संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन हा फार उत्साहाने साजरा केला जातो. नव्या दिल्लीत तर परेड असते. मोठ्या प्रमाणावर देशातील राज्यकारभार सांभाळणारे जमा होतात.

संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन हा फार उत्साहाने साजरा केला जातो.

नव्या दिल्लीत तर परेड असते. मोठ्या प्रमाणावर देशातील राज्यकारभार सांभाळणारे जमा होतात. महान हस्तिना मानवंदना दिली जाते. देशातील संस्कृतीचे प्रदर्शन होते. तसेच बऱ्याच स्पर्धा देखील असतात. तसेच शाळा – कॉलेजांमध्येही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी जवानांचे तसेच भारतीय इतिहासात आपले प्राण गमावलेल्या थोरवीरांना श्रद्धांजली दिली जाते. भारताचा इतिहास फार मोठा आहे. यावर बऱ्याच लोकांनी पट कथा, कथा कादंबऱ्या लिहून भविष्यातील पिढीसाठी उपलब्ध करून ठेवलेला आहे. बॉलीवूड मध्ये देखील या विषयावर विविध चित्रपट काढण्यात आले. हे चित्रपट भारतीय इतिहास तसेच वीरांच्या बलिदानाचे काल्पनिक दर्शन दाखवते. म्हणूनच यांच्या वर्षी तुमच्या मुलांसोबत देशभक्तीवर आधारित चित्रपट नक्की बघा. आता हे नक्की कोणते चित्रपट आहेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१९८१ चा भारतीय ऐतिहासिक चित्रपट मानला जातो. मनोज कुमार, दिग्गज अभिनेते दिलीप कुमार, शत्रघ्न सिन्हा, परवीन बाबी, शशी कपूर, हेमा मालिनी यांची प्रमुख भूमिका असलेला क्रांती हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये स्वातंत्र्यापूर्वीचा काळ दाखविण्यात आला आहे. आजही हा चित्रपट बघितला किअंगावर काटे येतात. इतके थरारक आणि वास्तव रुपी दर्शन आपल्याला होत असते.

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित रंग दे बसंती हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर प्रश्न उठवला आहे. या चित्रपटामध्ये आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी, सिद्धार्थ आणि सोहा अली खान या कलाकारांनी काम केले आहे.

१३ जून १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला बॉर्डर चित्रपट भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये सिमेवर लढणारे जवान, त्यांचा संघर्ष आणि कुटुंबाप्रतीची ओढ हृदय पिळवटून टाकते. या चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली असून आजही ही गाणी प्रत्येक भारतीयांच्या ओठी दिसून येतात. कित्येक जणांच्या रींगटोन सुद्धा असतात. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, राखी, पूजा भट्ट, पुनित इस्सर यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

हा चित्रपट १७ डिसेंबर २०१४ ला प्रदर्शित झाला होता.आशुतोष गोवारीकर यांच्या स्वदेशमध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. शाहरुखने नासामधील एका वैज्ञानिकाची भूमिका साकार केली असून आपल्या गावाच्या विकासासाठी तो कसा नोकरी सोडून गावी जातो आणि परदेशातून आलेला शारुख कसा स्वदेशी होतो हा प्रवास या चित्रपटात दाखवला आहे.

शहीद भगत सिंहच्या जीवनावर आधारित चित्रपटांपैकी हा एक चित्रपटआहे. राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केलेला ‘द लीजेंड ऑफ भगत सिंह’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. या चित्रपटाला २००३ सालचा फिल्मफेअर अवॉर्ड (Filmfare Award)आणि राष्ट्रीय पुरस्कार (National Award) प्रदान केला गेला होता. या चित्रपटात अजय देवगण याने भागात सिंग यांची प्रमुख भूमिका साकार केली होती.