जळगाव – जिल्हा अंतर्गत व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तसेच सीईटी सेल अंतर्गत नोंदणी होऊन प्रवेश घेणाऱ्या अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मागासवर्गीय विदयार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, सदर मागासवर्गीय विदयार्थ्यांनी दि.
15 जून, 2024 पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदीर समोर महाबळ जळगाव येथे जात वैधता अर्ज जमा करण्यात यावा.
जे मागासवर्गीय विदयार्थी 15 जून, 2024 नंतर तसेच उशीराने अर्ज सादर करतील किंवा त्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास त्यास स्वता विदयार्थी जबाबदार राहील असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य व्ही. एम. वाकुलकर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव यांनी केले आहे.