वाघुर धरण ९६ टक्के भरले , नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – येथून जवळच असलेल्या वराडसिम येथील वाघुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे त्यामुळे आज रोजी धरण ९६ टक्के भरले आहे. तसेच वाघुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेले मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले असल्याने त्यातील पाण्याचा विसर्ग सुरू आहे . त्यामुळे येत्या एक दोन दिवसात वाघुर धरणाचे वक्र दरवाजे उघडण्यात येऊन काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याचे पत्र जा क्र.पाउविजा / ८५८ / २०२३ दि.२५ / ९ / २०२३ नुसार प्रांताधिकारी भुसावळ व जळगाव यांना पी एम पाटील उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उप विभाग जामनेर यांनी पाठविले असून या पत्रातून वाघुर नदीच्या काठावर असलेल्या जळगाव तालुक्यातील निमगाव, बेळी, जळगाव खुर्द, कडगाव, खिर्डी, तिघ्रे व भुसावळ तालुक्यातील, सुनसगाव, गोंभी, साकेगाव या गावांना पुराच्या पाण्याचा धोका होऊ शकतो म्हणून नदी काठा लगत असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे यासाठी संबंधित सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी गावात दवंडी द्यावी असे ही या पत्रकात म्हटले आहे.