हतबल झालेल्या ऑटोरिक्षा चालकां करिता तातडीने उपाय योजना आखाव्या विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशन ची राज्य परिवहन आयुक्तांकडे मागणी .

दि. २२/१२/२०२२ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय , नागपूर , येथे महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त माननीय विवेक भीमनवार यांच्या समक्ष , विदर्भ ऑटोरिक्षा फेडरेशन ची विशेष बैठक संपन्न झाली .

विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशन चे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती चे महासचिव

मा. विलास भालेकर जी प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे

यांच्या हस्ते मा. परिवहन आयुक्त साहेबांना ऑटोरिक्षा चालकांच्या राज्यस्तरीय मागण्यांचे निवेदन देण्यात आले .

१) २०१३-१४ अभ्यास समिती निर्मित ,परिवहन विभागा अंतर्गत ऑटोरिक्षा चालक मालकांच्या भविष्यासाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना व्हावी , (२) अतोनात प्रमाणात वाढलेले खुले परवाने बंद करण्यात यावे , (३) बेकायदेशीर रॅपिडो व इतर टू व्हीलर प्रवासी वाहतूक अप्स बंद करण्यात यावे , (३) ऑटोरिक्षा चालकांकरिता स्वतंत्र सरकारी अप्स निर्माण करावे , (४) ई रिक्षा , ई इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा, व ई कार्ट वाहनांना परवाना बंधनकारक करावे , (५) ऑटोरिक्षा इन्शुरन्स.(विमा ) चे दर कमी करण्यात यावे, (६) अवैध प्रवासी वाहतुकीवर कायमची बंदी घालण्यात यावी , (६) कोरोना महामारीमुळे थकीत झालेल्या ऑटोरिक्षा चालकांचे बँक व फायनान्स कंपनीचे कर्ज व्याजासहित माफ करण्यात यावे .

इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून. राज्यातील प्रत्येक ऑटोरिक्षा चालक शासकीय नियमाप्रमाणे तंतोतंत पालन व पूर्तता करीत असतो पण. त्याचा ऑटोरिक्षा व्यवसाय मात्र हिसकावून गेला आहे.. परिणामी ऑटोरिक्षा चालक कर्जबाजारी होऊन मरणासन्न मार्गावर पोहोचला आहे

त्याला मुख्य धारेवर आणण्याकरिता तातडीने उपाय योजना आखण्यात याव्यात .अशी मागणी विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशन चे अध्यक्ष मा .विलास भालेकर यांनी केली .

19/10/2022 रोजी , मुंबई येथे , ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य सोबत झालेल्या बैठकीतून उत्पन्न विविध मागण्यां विचाराधीन असून , लवकरच त्याची पूर्तता केली जाईल असे आश्वासन माननीय परिवहन आयुक्त भिमनवार साहेब यांनी दिले..

तसेच स्थानीय पातळीवर नागपूर शहराकरिता प्रवासी वाहतूक सुव्यवस्था अंमलात आणण्यासाठी काही निर्देश , नागपूर शहराचे प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. विजय चव्हाण यांना देण्यात आले .

आजच्या परिवहन विभागाच्या विशेष बैठकीला ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कॄती समिती महाराष्ट्र राज्य महासचिव तथा विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष

मा.विलास भालेकर जी सोबत , ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य चे उपाध्यक्ष (खांन्देश विभाग)

मा. प्रल्हाद सोनवणे ( जळगाव ), तसेच विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशन चे महासचिव राजू इंगळे आणि टायगर ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष जावेद शेख , महासचिव प्रकाश साखरे, ऑटोरिक्षा चालक वेल्फेअर फाउंडेशनचे सचिव वैभव कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.