जळगाव -: तालुका पोलीस स्टेशन येथे दोन वर्षापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी नामे सय्यद इम्रान उर्फ इब्राहिम सय्यद गंबीर वय 33 वर्ष रा सावदा ता रावेर जि जळगाव यास सावदा येथून ताब्यात अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि दिनांक 28/11/2019 रोजी कीनोद कृषीउत्पन्न बाजार समीती येथे सय्यद गंभीर सय्यद सांडू आणी फिरोज गंभीर तडवी है मालट्रक क्रमांक R-GA-6615 हि घेऊन आले. त्यांनी तोलकाटयावर खाली मालट्रकचे वजन करून गाढोदा शिवारातील शेत गट नं 312 मध्ये आले. तेव्हा त्यांनी केळी कटाई सुरू केली. केळी वाहतूकीसाठीही मजूर त्यांनी सोबत आणलेले होते. ते कटाई करून माल भरत असतांना मी त्यांना चर्चेत नायगांव विचारता मला कळाले की केळांचे वजन करणारा मजूर याचे नाव जयंत पाटील रा. आमोदे असे होते.याने माझे शेतातील 94 टन 72 किलो वजनाची केळीचे घड कापले त्यांची मालट्रक भरण्यास अजून मालाची गरज असल्याने मी माझे ओळखीचे भोकर गावाचे शेतकरी- भाईदास पाटील व दिपक कौतिक पाटील, चंद्रशेखर पवार यांना संपर्क करून त्यांना माल देण्याबाबत विचारले तेव्हा त्यांनी होकार दिल्याने मी सदरची मालट्रक घेउन भोकर गावी गेला. येथील वरील तिन्ही लोकांची केळीचे घड सय्यद गंभीर सय्यद सांडू आणि फिरोज गंभीर तडवी यांना पाहणी करून ते कटाई करून मोजून घेतले. त्यात भाईदास पाटील यांचे 20 क्विंटल 42 किलो, दिपक कौतिक पाटील यांचे शेतात 20 क्विटल 53 कि, चंद्रशेखर पवार यांचे शेतातील 21 क्विंटल 53 किलो इतकी वजनाची केळी कापून मोजून नेले. नंतर पून्हा एकत्रीत सर्व मालाचे वजन कीनोद उत्पन्न बाजार समीती येथिल तोल काटयावर मोजले असता ट्रक मधिल एकूण केळांचा सर्व माल हा 15 टन 9 क्विंटल 85 किलो इतके वजनाचा भरला त्यात माझे मालाचे 950 रुपये क्विंटल प्रमाणे 85286 रुपये, बाकी शेतकरी यांचे 1111 रूपये क्विंटल भावाने भाईदास पाटील यांचे 22764/- रुपये दिपक कौतिक पाटील यांचे 23999/- रुपये चंद्रशेखर पवार यांचे 9476 रुपये असे एकूण 141389 रुपयेचा माल विकत घेतला. सदरचा माल हा माझे एकट्याचे नावे मोजण्यात आला आहे. ठरल्याप्रमाणे केळीच्या मालाचे पैसे मांगितले असता, त्यांनी मला आता रोकड नाही असे सांगून इब्राहिम सय्यद गंभीर याला बोलाविले त्याने अॅक्सीसचा बँकेचा 100000 एक लाख रूपये) चा चेक मला दिला व बाकी पैसे उद्या देतो अशी त्यांनी विनंती केली त्याने मला चेक दिल्याने ते मला उद्या पैसे देतील या भरोशावर मी त्यांना होकार दिला नंतर ते गाडी घेउन गेले. मी सय्यद आणी फिरोज गंभीर यांंना फोन करून पैश्यांची मागणी केली असता त्यांनी आज देती उदया देतो असे उडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली .
तसेच इब्राहिम याने आणून दिलेला चेक मी बँकेत वटविण्यास गेलो असता तो सेल्फ असल्याने मला वटवता येणार नाही. असे [बैंकेतील लोकांनी सांगीतले तेव्हा मी त्या अकाउंटवर शिल्लक आहे का बाबत विचारना केली असता त्यात रक्कम शिल्लक नव्हती ते खाते पप्पू फ्रूट सप्लायर्स नावाने आहे. हे सर्व माझे लक्ष्यात आल्याने मी वरील तीघ इसमांना संपर्क करून कळविले असता ते आम्हाला वेळ दया तूमचे पैसे देतो. असे सांगून वेळ मारून नेत होते. मला प्रत्यक्ष भेटणे टाळत होते. त्यावरून माझी खात्री झाली की, माझा विश्वास संपादन करून माझा व माझे भरवश्यावर भोकर येथिल तिघ शेतकरी यांचा केळीचा माल लबाडीने कापून नेला व त्यांचा मोबदला न देता माझी फसवणूक केली आहे. त्यानंतर मी जळगांव तालुका पोलीस स्टेशनला अर्ज दिला होता. परंतू त्या अर्ज चौकशी कामी सुध्दा वरील इसम हे हजर राहत नव्हते.त्यानंतर मी तालुका पोलीस स्टेशन येथे १)सय्यद गंभीर सव्यद मांडू सावदा आणी २शफिरोज गंभीर तडयो रा. आमोदे ता. यावल ३)सय्यद इब्राहीम सय्यद गंभीरया तिघं इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता. त्यानुसार आज दिनांक 16 रोजी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनखाणी PSI नयन पाटील, पो हे कॉ विश्वनाथ गायकवाड, पो हे कॉ चेतन पाटील व पो कॉ तुषार जोशी यांनी इब्राहिम सय्यद गंभीर यास अटक करण्यात आली