राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
अजित पवार विरोधी पक्षनेताचा राजीनामा अगोदर देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे. राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार आज शपथ घेण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला विरोधीपक्षनेते पद नको आता संघटनात्मक जबाबदारी हवी असं म्हणत नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली आणि त्यानंतर चर्चा सुरु झाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदाबाबत जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. 6 जुलैला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे, या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे, अशातच आत अजित पवार सत्तेत सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.