ममुराबाद येथील २६ जानेवारीच्या ग्रामसभेत गोंधळ ! बौद्ध विहारासाठी परस्पर जागा दिल्यामुळे गोंधळ

ममुराबाद – जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील ग्रामपंचायतीची दिनांक २६ जानेवारी घेण्यात येणारी ग्रामसभा गोंधळात पार पडली. ग्रामस्थांच्या प्रश्नांचा भडीमार व सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून असंतुष्ट उत्तरे यामुळे ग्रामसभेत गोंधळ निर्माण झाला.

ममुराबाद ग्रामपंचायतीची तीन वर्षांपूर्वी निवडणूक झाली. तेव्हा पासून ते आजपर्यन्त नागरीकांच्या समस्या सुटत नसल्याने ग्रामसभेला आलेल्या ग्रामस्थांनी सरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी यांना धारेवर धरले.

गावी दलितांनसाठी बौद्ध विहार बांधकामासाठी निधी मंजुर असल्याने ग्रामपंचायतीने परस्पर गट नंबर ८७८ मध्ये तीन हजार स्क्वेअर फुट जागा दिल्याची तक्रार गावातील रुख्मीनी नगरच्या रहिवाशांनी तक्रारी अर्जाद्वारे या तक्रारी अर्जावर जवळपास तेहतीस स्थानिकांच्या सह्या आहेत.

ग्रामपंचायतीने सदरची जागा बौद्ध विहारासाठी देतांना कोणत्याच ग्रामसभेमध्ये विषय मांडुन ठराव नकरता ती जागा परस्पर दिल्याने स्थानिक आक्रमक झाले.

गट नंबर ८७८ मधिल रुख्मीनी नगरमध्ये ओपण सोसपैकी तीन हजार स्क्वेअर फुट जागा भिल्ल समाजाच्या समाज मंदिरा साठी दिली गेली आहे. त्यातच आत्ता दलितांच्या बौद्ध विहारासाठी मोठी जागा दिल्याने सदर कॉलनीमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान नसल्याने मुलांनी खेळायचे कुठे असा प्रश्न ग्रामसभेला आलेल्या रुक्मिणी नगर येथील रहिवाशांनी उपस्थित केला.

वरिल मुद्दा स्थानिक रहिवाशांनी उपस्थीत केल्यामुळे ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला.

वरिल गटामध्ये ओपन स्पेस पैकी काही जागा महर्षि वाल्मिक ऋषी तसेच राममंदिराठी देण्यात यावी अशी मागणी देखील ग्रामस्थांनकडून करण्यात आली

तसेच गावी होत असलेल्या जलजिवन मिशनच्या पाईपलाईनचे काम देखील बंद करण्यास यावे ठेकेदार गावामध्ये अडिच इंची पाईप लाईन टाकत असल्यामुळे गावाला होणारा पाणीपुरवठा होणे शक्य नाही त्यामुळे गावातील पाईप लाईनचे काम त्वरीत बंद करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्यांनी केल्यामुळे सरपंच हेमंत चौधरी यांनी सदर विषयाला दुजोरा दिल्यामुळे पाईप लाईनचे काम त्वरीत बंद करण्यात येऊन ज्या ठिकाणी ठेकेदाराने पाईप टाकले आहेत त्या ठिकाणी रस्तांची दुरअवस्था झाली आहे. त्याठीकाणी त्वरीत रस्ता सुधारण्यात येईल असे सरपंचानी सांगीतले. ग्रामसभेमध्ये गोंधळ झाल्याने उर्वरीत विषय न घेता ग्रामसभा संपल्याचे सरपंच व सदस्यांनी जाहिर केल्यामुळे ग्रामस्थांनमध्ये नाराजीचे वातावरण पहावयास मिळाले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh