शपथविधी नंतर तब्बल ४० दिवसांनी अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यात मंत्र्यांच्या निवडीची संख्या ५०/५० अश्या समीकरणाने शिंदे गट व भाजपकडून बघायला मिळाली.
मात्र, आता सूत्रांकडून मंत्र्यांना संभाव्य खाते मिळण्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये मुख्यमंत्री स्वतःकडे नगरविकास खाते तर उपमुख्यमंत्री गृह खात्यासह अर्थ खातेही ठेवण्याची शक्यता आहे.
संभाव्य खातेवाटप
एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री (नगरविकास)
देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) गृह आणि अर्थ
राधाकृष्ण विखे पाटील – सहकार
सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा, वन
चंद्रकांतदादा पाटील – महसूल, सार्वजनिक बांधकाम
विजय कुमार गावित- आदिवासी विकास
गिरीश महाजन – जलसंपदा
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा
दादा भुसे- कृषी
संजय राठोड- ग्राम विकास
सुरेश खाडे – सामाजिक न्याय
संदीपान भुंभरे- रोजगार हमी
उदय सामंत – उद्योग
तानाजी सावंत- उच्च तंत्र शिक्षण मंत्री
रवींद्र चव्हाण- गृह निर्माण
अब्दुल सत्तार- अल्पसंख्यांक विकास
दीपक केसरकर- पर्यटन आणि पर्यावरण
अतुल सावे – आरोग्य
शंभूराज देसाई- उत्पादन शुल्क
मंगलप्रभात लोढा- विधी न्याय