ममुराबाद -: सध्या वडनगरी येथे पाच तारखेपासुन सुरु असलेल्या शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येत असल्याने ममुराबाद येथे मोठ्या प्रमाणात वाहाणांच्या रांगाच्या रांगा लागत आहे. जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे बडे जटाधारी महादेव मंदिरावर शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नागरीकांनी एकच गर्दि केली आहे. ममुराबाद गावापासुन कथेच्या ठिकाणी जाणारा रस्ता जवळ येत असल्याने सर्व भाविकांची गर्दि ममुराबाद गावाहुन कथेच्या ठिकाणी जात आहे. सर्व भाविक ममुराबाद येथुन जात असल्याने गावात तसेच बसस्टँडवर वाहाणांच्या रांगाच्या रांगा लागत आहे. रस्ता सुरळीत करण्यासाठी गावी पोलीस प्रशासणाने काही पोलीस कर्मच्याऱ्यांना कर्तव्यास पठिवले आहे. परंतु सदर कर्तव्यास असलेले पोलीस कर्मचारी रस्त्यातच आपल्या स्वताच्या मोटार साईकल लावुन गप्पा मारतांना दिसत आहे.
दुसरीकडे हे पोलीस महाशय व्हिडीओमध्ये बघा कसा कोपरा धरुण बसलेले आहे.
पोलिसांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे नागारिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.