जळगाव -शहरातील विवेकानंदनगर (Vivekananda Nagar) येथील बगीचासमोर शिक्षकाला मारहाण करुन त्याचा मोबाईल (Mobile) लांबविल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी घडली होती. या गुन्ह्याचा जिल्हापेठ पोलिसांनी (District Police) छडा लावला असून तीन संशयित निष्पन्न केले आहे. यात दोन सराईत गुन्हेगार भोलासिंग जगदिशसिंग बावरी ३५ वर्ष व रिजवान काल्या गयासुद्दिन शेख दोन्ही रा. तांबापुरा या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. बावरीला न्यायालयाने शनिवारी १३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, प्रेमनगर येथील शिक्षक प्रशांत सुर्यभान झाल्टे हे ६ सप्टेंबर रोजी त्यांच्या विवेकानंदनगरातील मित्राकडे गेले होते. तेथून काम आटोपून रात्री परतत असतांना विवेकानंदनगरातील बगीच्याजवळ झाल्टे यांना तीन जणांनी मारहाण करत त्यांचा मोबाईल लांबविला होता.
याप्रकरणी प्रशांत झाल्टे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल आहेत. या गुन्हयात संशयितांबाबत जिल्हापेठ पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्याानुसार अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्यासह महेद्र बागुल, मनोज पवार, फिरोज तडवी, तुषार जावरे, योगेश साबळे, समाधान पाटील, सलीम तडवी, संतोष सोनवणे, रेहान खान याच्या पथकाने भोलासिंग बावरी याला दुचाकीसह शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास अटक केली. त्याने त्याच्या दोन साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार रिजवान काल्या यालाही शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. एक संशयित फरार असून त्यांचाही शोध सुरु आहे. ुन्ह्याचा पुढील तपास महेंद्र बागुल हे करीत आहेत.