समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव स्वामी प्रसाद मौर्य हे एका वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. दगडावर प्राणप्रतिष्ठापना केल्यावर तो सजीव होऊ शकतो मग मृतदेह का चालू शकत नाहीत?असा सवाल मौर्य यांनी विचारला आहे. कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, देशात बेरोजगारीवर चर्चा होऊ नये यासाठी अशाप्रकारची नाटकं केली जात आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या कार्यक्रमापासून चार हात लांब राहणे पसंत केले, कारण त्याही दिल्लीत झालेला अपमान जाणून होत्या. श्रीरामांना तर हजारो सालांपासून पुजले जाते आणि ज्याची पूजा हजारो सालापासून करोडो लोकं करत आहेत, त्यामुळे प्रभू श्री रामाची आता प्राणप्रतिष्ठापना करण्याची आवश्यकता नाही. आज सत्तेत बसलेली लोकं पापं लपविण्यासाठी अशाप्रकारची नाटकं करत आहेत अशी टीका मौर्य यांनी केली आहे.
स्वामी प्रसाद मौर्य पुढे म्हणाले की, लोकं प्राण प्रतिष्ठापनापना करत आपल्याला देवापेक्षा मोठे असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांना समजवायला हवे, आज बेजोजगारीवर चर्चा होऊ नये यासाठी अशाप्रकारच्या गोष्टी केल्या जातात. जर हे धार्मिक अनुष्ठान खरेच असते तर त्यात चारही शंकराचार्य असते. या कार्यक्रमाला देशाच्या राष्ट्रपतींना आमंत्रित केल्यानंरही त्या आल्या नाहीत. याचे कारण म्हणजे 2014 मध्ये झालेला अपमान त्या विसरु शकलेल्या नाहीत असे मौर्य यांनी म्हटले. ते पुढे म्हमाले की, हा कार्यक्रम फक्त भाजपचा राहिला आहे. कारण संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसचे लोक करत होते.
गाझीपूरच्या लंका मैदानावर जननायक कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला समाजवादी पक्षातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्याचे प्रमुख पाहुणे स्वामी प्रसाद मौर्य होते आणि व्यासपीठावरून बोलताना त्यांनी एक दिवसापूर्वी अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यावर प्रश्न उपस्थित करत म्हंटले की, जर दगडाची प्राण प्रतिष्ठापना केल्यावर तो सजीव होऊ शकतो, तर मृतदेह का चालू शकत नाहीत? हा सगळा ढोंगीपणा आणि दिखाऊपणा असल्याचे त्यांनी सांगितले. जो स्वत: देव आहे, सर्वांचे कल्याण करतो, अशावेळी मनुष्याची काय हिंमत प्राण प्रतिष्ठापना करण्याची. सत्तेत असलेली ही लोकं स्वतःला देवापेक्षा मोठे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत असे मौर्य यांचे म्हणणे आहे.