सुनसगावात नवरात्रीच्या घटाचे नदीपात्रात विसर्जन!

भुसावळ – येथे दरवर्षी नवरात्रीच्या उत्सवात भगत मंडळी आपापल्या देवघरात घटाची स्थापना करतात तसेच नवमीच्या दिवशी गावातून देवकाठी काढण्याची परंपरा आहे मात्र या वर्षी येथील वामन शिवा सावळे धनगर (भगत) यांच्या घरी घटाची स्थापना करण्यात आलेली होती. त्यांनी गावातील सुपडू कंखरे हे चालवित असलेल्या वही गायन मंडळाच्या माध्यमातून गावातून घटाची मिरवणूक काढली. यावेळी वही गायनाच्या माध्यमातून गावातील ठिकठिकाणी असलेल्या देवमढी तसेच श्री हनुमान मंदिर अशा ठिकाणी थांबून वही गायन मंडळाच्या गायक कलावंतांनी आपली कला सादर केली व घटाचे वाघुर नदीच्या पात्रात विसर्जन केले यावेळी वामन धनगर (भगत), संतोष कुंभार (भगत), गायक सुपडू कंखरे, ज्ञानेश्वर खडके, भैय्या कंखरे , अनिल भगत यांचे चिरंजीव अशोक बाविस्कर, समाधान सावळे, शुभम सावळे व सावळे परिवारातील सदस्य उपस्थित होते.