भुसावळ – येथील श्री विठ्ठल मंदिरात शेकडो वर्षांपासून मुर्त्यांची स्थापना करण्यात आली होती मात्र आता शेकडो वर्षे झाल्याने आणि आता श्री पांडुरंगाच्या मुर्तीला तढा गेल्याने मंदीर संस्थान ने व नवयुवक गृप च्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्याने गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होता तसेच नामसंकीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात हभप वासुदेव महाराज बेळी , हभप डालेंद्र महाराज आसोदा व श्री क्षेत्र कुंडलेश्वर भगवान संस्थान बेळी चे मुख्य सेवक हभप भरतजी महाराज यांच्या काल्याच्या कार्यक्रमाने या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता करण्यात आली
या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा सर्व खर्च मंदिराचे उपाध्यक्ष चंद्रकांत हेमराज भोळे यांच्या कुटुंबाने उचलला असून महाप्रसाद करण्यासाठी ग्रामस्थांच्या व परिसरातील नागरिकांचे मोठे योगदान होते या कार्यक्रमामुळे गावात भक्तीभावाचे व नव चैतन्य निर्माण झाले होते.आता मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे.
या कार्यासाठी नवयुवक गृप चे सहकार्य लाभले तर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी गावातील सर्व मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.