सुनसगाव परिसराला पावसाची हुलकावणी !

सुनसगाव – पावसाळा सुरू होऊन एक महिना संपला तरी पेरणी योग्य पाऊस पडला नाही तसेच काही शेतकऱ्यांनी पाऊस येणार या आशेवर धुळ पेरणी केली त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पुन्हा कर्ज बाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

साधारणतः जून महिन्यात पाऊस पडतोच हे गृहीत धरून परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत करून शेती तयार केली मात्र आज उद्या पाऊस पडणार या आशेवर काही शेतकऱ्यांनी पाऊस पडण्या अगोदर धुळ पेरणी केली महागडे बियाणे शेतात टाकले मात्र किरकोळ स्वरुपाचा पाऊस पडला त्यामुळे हजारो रुपये किंमतीचे बियाणे वाया गेले एवढेच काय तर काही शेतकऱ्यांची अजूनही पेरणी झालेली नाही शेती पेरणीसाठी तयार आहे परंतु पाऊस नाही त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत कारण एक महिना जरी पेरणी ऊशीरा झाली तरी त्याचा हंगामावर परिणाम होतो आणि शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित चूकते आणि शेतकऱ्यांवर कर्ज बाजारी होण्याची वेळ येते.आजही अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडला आहे मात्र काय करणार ! पुन्हा नविन उमेदीने शेतकऱ्यांनी कापसाचे महागडे बियाणे घेऊन शेतात टाकले आहे .

” पडरं पाण्या ,पडरं पाण्या कर पाणी पाणी . शेत माझं लयी चांगल चातका वाणी “! अशी म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे.