प्रतिनीधी – जितेंद्र काटे
भुसावळ – भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील श्री हनुमान मंदीराची साफसफाई येथील तरुण तसेच बालगोपाल यांनी केली दिवाळी साजरी करीत असताना श्री हनुमानाचे मंदिर ही सुंदर दिसावे यासाठी हनुमान मंदिर परिसरातील बालगोपाल व तरुण एकत्र आले आणि मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर करण्यास सुरुवात केली आहे.आता सध्या मंदिराला हेच तरुण रंग देत आहेत. विशेष म्हणजे आताची तरुण पिढी मोबाईल फोन मध्ये अडकलेली दिसते मात्र येथील बालगोपाल व तरुण मुले धार्मिक कार्यक्रमात गुंतलेले पाहून या मुलांच्या आई-वडिलांनी सुध्दा समाधान व्यक्त केले आहे.
तरुणांनी घेतलेल्या पुढाकाराने दिवाळीच्या सणात श्री हनुमान मंदीर परिसर उजळून निघाला आहे.