जळगाव -अनैतिक संबंधात मुलगा अडसर ठरत असल्याने त्याचा काटा काढण्यासाठी आईनेच आपल्या मुलाला बऱ्हाणपूरच्या जंगलात नेऊन गळफास देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली असून तालुका पोलिसांनी मयत मुलाची आई आणि प्रियकराला अटक केली आहे. पुरूषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील (वय-१४) रा. सावखेडा शिवार, जलाराम नगर जळगाव असे मयत मुलाचे नाव आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , मयत प्रशांत पाटील या मुलाचे वडील विलास पाटील हे खासगी वाहन चालक असून ते पत्नी मंगलाबाई पाटील (वय ३५) हे सावखेडा शिवारातील जलाराम नगरमध्ये राहतात . मंगलाबाई पाटील हिचे प्रमोद जयदेव शिंपी (वय-३८) रा. विखरण ता. एरंडोल याच्याशी अनैतिक सम्बन्ध असल्याची माहिती समोर आली असूनत्यांच्या अनैतिक संबंधांमध्ये मुलगा प्रशांत पाटील हा अडसर ठरत असल्याने त्याची आई मंगलाबाई आणि प्रमोद शिंपी यांनी मुलाला १६ जानेवारी रोजी रावेर येथून कबुतर ठेवण्याचा पिंजरा घेवून येवू असे आमीष देऊन मध्यप्रदेशातील बर्हाणपुर जवळ एका गावाजवळील जंगलात घेऊन गेले. त्यांनी प्रशांत पाटील याला गळफास देवून झाडाला लटकावून ते दोघे जळगावात परतले .
मुलगा बेपत झाल्याची दिली तक्रार
मुलाचा गळफास देऊन जळगावात परतलेली वडील विलास पाटील यांनी तालुका पोलीस स्टेशनला मुलगा प्रशांत पाटील हरविल्याची तक्रार दिली .
पोलीसांनी मयत प्रशांतच्या मोबाईलचे कॉल डिटेल तपासले असता प्रमोद शिंपी यांच्या मोबाईलवर वारंवार कॉल केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रमोद शिंपी आणि मयत प्रशांत पाटीलचे लोकेशन एक असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी तपास केला.
पोलीसांनी २६ जानेवारी रोजी दुपारी संशयित आरोपी प्रमोद शिंपी याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यासाठी मयत प्रशांतची आई मंगलाबाई पाटील याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी दोघांना अटक केली. पोलीसांनी बर्हाणपुर येथील जंगलातील घटनास्थळी जावून मुलाच्या मृतदेहाचा पंचनामा केला आहे. दरम्यान, मुलाचा खून करणार्या दोन्ही संशयित आरोपींना गुरूवार २७ जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयाने १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या गुन्ह्याच्या तपासाकामी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार वासुदेव मराठे, सतीश हाळणोर, भांडारकर यांच्यासह गुन्हेशोध पथकाने हा खुनाचा गुन्हा उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.