जीवनात संयम पाळा व सदाचार वाढवा दसनूर येथे भागवत कथेत डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज यांचे प्रतिपादन

रावेर प्रतिनिधी- तालुक्यातील निंभोरा येथून जवळच दसनूर येथे स्वयंभू उमेश्वर महादेव मंदिरातील भक्तीनिवास मध्ये सुरू असलेल्या भागवत कथेच्या चौथ्या पुष्पात जीवनात संयम पाळा व सदाचार वाढवा असे स्पष्ट मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रसिद्ध कथाकार डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांनी मांडले भागवत कथेचे निरूपण करतांना ते म्हणाले मानवी जीवनाची अंतीम परिक्षा मृत्यू आहे. ज्याचे जीवन सुंदर त्याचे मरणही सुंदरच असते. ज्याचे मरण अशांत रितीने होते त्याचे जीवनही व्यार्थ गेले समजावे. ज्याला वेळेची कींमत असते जो क्षणा क्षणाला सुधारतो त्याचेच मरण मंगलमय होते. गेलेली संपंत्ती पुन्हा मिळवता येते, पण गेलेली वेळ पुन्हा येत नाही. कणा कणाचा व क्षणा क्षणाचा सद्उपयोग करा. सत्कर्म कधीही वाया जात नाही. जीवनात आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाचा, संपत्तीचा, कौशल्याचा गरजवंतासाठी उपयोग करा. जीवनात संयम पाळा व सदाचार वाढवा. हे जीवन पुन्हा नाही आलेल्या संधीचे सोने करा । भागवत कथा ही जगण्याचा मार्ग शिकवते दसनूर सह परिसरात ही सुध्दा भाविक भक्तांसाठी सुवर्ण संधी आहे. असे स्पष्ट विचार दसनूर येथिल उमेश्वर महादेव मंदिरातील भक्तीनिवास मध्ये कै.सौ.सुमनबाई विठ्ठल महाजन यांच्या स्मरणार्थ विठ्ठल रावजी महाजन व महाजन परिवाराकडून आयोजीत भागवत कथेत भागवताचार्य स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज यांनी मांडले. या वेळी सर्व भाविक भक्त भक्तीमय व संगितमय भक्तीरसात न्हाऊन निघाले व मंत्रमुग्ध झाले होते. या मुळे स्वयंभू उमेश्वर महादेव मंदिरासह दसनूर नगरीला भक्तीमय स्वरूप आले आहे. या वेळी भागवताची आरती खीर्डीचे जयंत पाटील, अहिरवाडीचे अनिल चौधरी, दसनूर चे वैभव महाजन, श्रीराम महाजन, किरण पाटील, अर्चना पाटील, भाग्यश्री पाटील, कल्पना पाटील, अलका महाजन यांच्या सह भाविकांनी केली यावेळी दसनूर व परिसरातून भाविक भक्त गण उपस्थीत होते.