रावेर लोकसभेचा खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष ॲड देवकांत पाटील यांनी दिले विरावली गावाच्या विकासासाठी निवेदन

प्रतिनिधि अमीर पटेल

रावेर – लोकसभेच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे ह्या जन संपर्क अभियान निमित्त विरावली या गावात आल्या असता विरावली विकास सोसायटीच्या वतीने संस्थेचे चेअरमन अर्जुन पाटील व व्हाईट चेअरमन नरेंद्र सोनवणे व संचालक मंडळाने स्वागत केले या कार्यक्रमात सर्व संचालक मंडळ सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याच कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष यांनी व काही गावकऱ्यांनी गावकऱ्यांच्या वतीने विविध समस्या व उपाय योजना संदर्भात मागणी केली त्यात शेतकरी कर्ज माफी योजने चे अनेक लाभार्ती वंचित राहिल्याचे तसेच नियमित कर्जदार प्रोत्साहन लवकर मिळावे , हवामानाचे पीक नुकसानाची विमाच्या लाभ काही शेतकऱ्यांना लाभ न मिळाल्या बाबत ग्रा प सदस्य तथा युवक राष्ट्रवादी अध्यक्ष ॲड. देवकांत पाटील यांनी विरावली गावात वार्ड क्र 3 मध्ये बस स्थानक ते हनुमान मंदिर ते सुरेश बंडू पाटील यांचे शेत हा रस्ता विरावली गावातील मुख्य रस्ता असून ह्या रस्त्याने चालतांना पावसाळ्यात लहान मूल व ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वांचे प्रचंड हाल होत असतात तरी आपण खासदार निधीच्या माध्यमातून आमच्या विरावली गावात कॉंक्रिटीकरण करून विरवली गावातील मुख्य रस्ता तयार करून द्यावा की आपणास वार्ड क्र 3 च्या नागरिकांची मागणी केली व दुसरे एक निवेदन देत काही दिवसापासून आपल्या राज्यात लम्पी या त्वचा रोगाशी संबंधित गाई व बैल या आपल्या जनावरांना संसर्गजन्य रोगाने ग्रासले असून त्यांच्यावर होणारे उपचार हे मोफत व्हावेत त्याचप्रमाणे ज्या पशुपालकांचे जनावरे लम्पि या संसर्गजन्य आजारामुळे मृत्युमुखी पडली असतील त्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरता आम्ही आपणास यावल युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विनंतीपूर्वक निवेदन देत आहोत तरी गोमातेचे व शेतकऱ्याचा खरा मित्र असणारा बैल या आपल्या पशुंचं काळजी घेणे खूप आवश्यक आहे तरी आपण आपल्या स्तरावर लवकरात लवकर आमच्या मागणीची दखल घेऊन अंमलबजावणी करावी अशी आम्ही आपणास विनंती केली

तसेच लंबी या आजाराचे मोफत उपचार व्हावे याकरता गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले खासदारा सोबत

माजी जि प सदस्य रवींद्र पाटील माजी जी प सदस्या सविता भालेराव लीलाधर चौधरी , विलास पाटील , उज्जनसिंग पाटील अतुल भालेराव यांची ही उपस्थिती होती विरावली गावातून ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष ॲड.देवकांत पाटील भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील विकास सोसायटीचे माजी चेअरमन संजय पाटील संचालक गुलाब पाटील संचालक बाजीराव पाटील संचालक संजय मोतीराम पाटील माजी संचालक शरद पाटील, दिनकर पाटील भावडू पाटील , युवराज पाटील , पवन पाटील , गिरीश पाटील गणेश पाटील योगेश पाटील तेजपाल पाटील , सुभाष पाटील बादशाह पाटील, विजयसिंह पाटील हिरालाल पाटील यशवंत पाटील अजबराव पाटील , सुरेश पाटील,नानाजी पाटील ,फकीरा पाटील , राजेश निळे, आदींची उपस्थिती होती . खासदार मोहदया यांनी सर्व मागण्या समस्या लवकरात लवकर सोडवणार असल्याचे आश्वासन दिले .

jalgaonsandesh

jalgaonsandesh