रामपुरा भागातील भिल्ल वस्तीतील रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याने जिल्हाधिकार्‍यांनकडे तक्रार.

हेमकांत गायकवाड

चोपडा : शहरातील रामपुरा भागातील कायम रहिवासी असून मी सन २००६ ते २०११ या कालावधीत चोपड़ा नगरपरिषदेचा नगरसेवक म्हणून कार्यरत होतो त्यामुळे चोपडा नगरपरिषद अंतर्गत होणाऱ्या कामकाजाची मला संपूर्ण माहिती आहे व आमच्या काळात चोपडा नगरपरिषद हद्दीत चांगले मजबूत टिकाऊ क्वालीटी असलेले कामे झालेली अहोत. आता सध्या आमच्या भागात श्री.रतन दगा भिल यांचे घरापासुन ते कैलास गंगाराम भिल यां घरापर्यंत तसेच आबा किसन भिल यांचे घरापासुन ते महारू धर्मा भिल यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता नगरपरिषदेमार्फत मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून करण्यात येत आहे व सदर रस्ता हा जवळपास पूर्ण झालेला आहे. परंतु सदर रस्त्याच्या एका बाजूस बांधकाम ठेकेदाराने जाणीवपूर्वक गटारींचे काम केलेले नाही त्यामुळे आता नुकताच झालेल्या दोन दिवसातील पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरले असून त्यांच्या घरातील चीज वस्तुंचे नुकसान झालेले आहे. सदर भागातील रहिवासी लोकांची पक्की घरे नसून मातीचं घरे आहेत व घरात पाणी शिरल्यामुळे सदर घरे पडण्याची शक्यता असून त्याठिकाणी त्या घरात राहणाऱ्या लोकांची जिवीतहानी होण्याची देखील शक्यता आहे. रस्त्याचे काम हे पूर्णत: निकृष्ट प्रतीचे असून क्वालीटी कंट्रोल कडून सदर रस्त्याच्या कामात वापरण्यात आलेले साहित्य तपासण्यात आलेले नाही. तसेच सदर भागात करण्यात आलेले दमदमे हे आजच वापरण्यात आलेल्या खराब मटेरियलमुळे पडून त्याठिकाणी मोठे होल तयार झालेले आहे त्या होलमध्ये रात्री बेरात्री मोठ्या व्यक्ती तसेच लहान बालक पडल्यास तसेच वाहन पडल्यास जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. मी वारंवार बांधकाम अभियंता, नगरपरिषद चोपडा यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून होणाऱ्या निकृष्ट कामाबद्दल माहिती देवून सदर काम पाहून ते तात्काळ चांगल्या पध्दतीने करण्याबाबत सांगीतले असता माझ्या फोनकडे बांधकाम अभियंता यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. माझ्या माहितीप्रमाणे ठेकेदारांनी बिले देखील काढून घेतलेले समजते.तरी माझी आता कळकळीची विनंती की, आपण प्रत्यक्ष जागेवर येवून पाहणी करून झालेल्या कामाबद्दल व निकृष्ट कामाची निरपेक्ष चौकशी करून संबंधीतांना आपल्यामार्फत गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांचेकडून पुन्हा चांगल्याप्रकारे कामे करून घेण्यात यावी किंवा त्यांनी काढून घेतलेले बिले पुन्हा नगरपरिषदेच्या खात्यात जमा करण्यासाठी त्यांना आदेशित करावे ही विनंती.

आपल्या मार्फत दिरंगाई झाल्यास नाईलाजास्तव दिवाळी अगोदर मोर्चा काढून लोकशाही मार्गाने न्याय मागणे भाग होईल याची नोंद घ्यावी.