भुसावळ – येथून जवळच असलेल्या बेलव्हाळ फाटा ते वराडसिम गावा पर्यंत ठिकठिकाणी काही झाडे रस्त्यावर पडली आहेत तर काही ठिकाणी काटेरी झुडपे वाढलेली आहेत त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत आहे ही झाडे अनेक दिवसांपासून पडली आहेत त्यामुळे वाहनधारकांनी बाजूने रस्ता मोकळा करून वाहतूक सुरू ठेवली आहे परंतु मोठे वाहन चालवताना वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे .या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत त्यामुळे ही त्रास सहन करावा लागत आहे .
वास्तविक पाहता सुनसगाव – वराडसिम हा रस्ता कुऱ्हा पानाचे , जामनेर ,वाघुर धरण , कंडारी , उमाळा या गावाकडे जाण्यासाठी सोयीस्कर आहे मात्र रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून नाईलाजाने या रस्त्यावरून वाहनधारकांना ये – जा करावी लागत आहे त्यामुळे लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन या परिसरातील नागरिकांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली जात आहे.