पारोळ्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा – तालुक्यातील वाघरे येथे एका बावीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. नितिन आधार पाटील (वय २२) असे या तरूणाचे नाव आहे. त्याने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२३ रोजी घडली.

तो पारोळा येथील एका खासगी रुग्णालयात रक्त लघवी तपासण्याचे काम करीत होता.

याबाबत यशवंत बुधा पाटील वाघरे यांनी पारोळा पोलिसात दिलेल्या खबरीवरून, दि. २३ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास वंदनाबाई आधार पाटील ह्या आरडाओरडा करत माझ्या घरी धावत आल्या व त्यांनी मला कळविले की भाचा नितील आधार पाटील (वय २२) याने राहत्या घरात दोरीस गळफास घेतलेला आहे.

यावेळी प्रविण यशंवत पाटील, ब्रीजलाल पाटील, रोहीत भागवत पाटील, बबलु चंदनराव पाटील, योगराज दगा पाटील हे धावत जावुन भाचा नितीन यास त्याने घेतलेल्या गळफासची दोरी काढून त्यास उपचारासाठी खाजगी वाहनाने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी दि. २३ रोजी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहेत.