ऑनलाईन कंपनीचे लोन पास झाल्याचे खोटे सांगून डॉक्टरांनी फसवले चार लाखात

जळगाव – डॉक्टरांनी आयुर्वेदिक कंपनीचे लोन पास झाले आहे. इतरांना पैसे द्यावे लागणार असल्याचे सांगून पाचोरा येथील एका व्यक्ती कडून चार लाख रुपये घेऊन ते परत न करता उडवडीची उत्तर दिली म्हणून पाचोरा पोलिसांत डॉक्टरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील खोटे नगर येथील तालुका पोलीस स्टेशन समोर राहणारे डॉक्टर व्यकटेश कालिदास कुलकर्णी यांनी पाचोरा येथे राहणारे गणेश कमलचंद झाजोटे यांना ऑगस्ट 2022 ते 18 नोव्हेंबर 2022 या काळात माझे आठ कोटी रुपयांचे आयुर्वेदिक कंपनीसाठी लोन पास झाले आहे. लोन कामासाठी इतरांना पैसे द्यावे लागणार आहे. म्हणून दहा ते पंधरा दिवसांसाठी साडेसहा लाख रुपये मला पाहिजे आहेत असे सांगून गणेश कमलचंद झाजोटे यांनी पत्नीच्या जेडीसीसी बँकेच्या पाचोरा शाखेच्या अकाउंट वरून डॉक्टरांच्या एचडीएफसी बँकेत चार लाख रुपये आरटीजीएस ने पाठवले मात्र नंतर पंधरा दिवसांनी- एक महिन्यांनी पैसे देतो असे सांगून पैसे न देता त्यांची फसवणूक केली म्हणून पाचोरा पोलिसांत डॉक्टरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.