राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 26 ते 31 कालावधीत क्रीडा स्पर्धां सर्व वयोगटासाठी स्पर्धांचे आयोजन

जळगाव(हिं.स.) -: राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी व विविध खेळ संघटनामार्फत 26 ते 31 ऑगस्ट कालावधीत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धा 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पुरुष व महिलांकरिता स्पर्धा घेण्यात येतील.

यात 19 वर्षावरील सॉफटबॉल स्पर्धा , योगासने व सुर्यनमस्कार स्पर्धा, पुशअप व सीटअप स्पर्धा, बास्केट बॉल, टेबल -टेनिस, बुध्दिबळ, बॅडमिटन कॅरम, सायकल रॅली, मीनी मॅरेथॉन, हॉकी ( पेनॉल्टी शुट आऊट), वयोगटात -100 मीटर धावणे, फुटबॉल, बॅडमिटन कॅरम, आर्म रेसलींग, वयोगट 41 ते 60 करिता – 50 मीटर धावणे, 300 मीटर धावणे, 1 कि. मी. चालणे, खो-खो, योगा, कॅरम, चेस बॅडमीटन, अर्म रेसलींग, लंगडी, लिंबु चमचा तसे 60 पेक्षा जास्त असलेल्या वयोगटासाठी – 300 मीटर चालणे, 1 कि मी चालणे, चेस, कॅरम स्पर्धा घेण्यात येतील.

तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महसूल विभाग, पोलीस विभाग, वित्त विभाग यांनीही विविध खेळाचे आयोजन करावयाचे आहे. कै. खाशबा जाधव व मेजर ध्यानचंद यांचे प्रतिमेचे पूजन व मार्गदर्शन्‍ पारंपारीक खेळ – विटी दांडू, टायर चालविणे, सागर गोटे, भोवरा फीरविणे, अष्टचंग, लिंबु शर्यत, दोरी उडी मारणे लगोरी, लंगडी, पोत्याची शर्यत, तीन पायाची शर्यत इ. बॅडमीटन स्पर्धा, टग ऑफ वॉर, बुध्दीबळ स्पर्धा शाळा महाविदयालय यांना इतर कार्यक्रम कारावयाचे असल्यास ते आयोजित करावे, जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव येथे संपर्क साधून आधारकार्डची झेरॉक्स प्रत जोडून आपल्या नावाची नोंदणी करावी. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविद्र नाईक यांनी केले आहे.