ओमनी कार चोरी करणाऱ्या दोघांना एलसीबी कडुन अटक

जळगाव – ओमनी कार चोरी झाल्याची घटना एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून घडली होती. ही कार शहरातील कालीपी चालविणाऱ्यांन चोरल्याची माहिती मिळताच अजिंठा चौफुली परिसरातून चंद्रकांत उर्फ गड्या न्द गोरख चौधरी (वय २७) व त्याचा त साथीदार विशाल लक्ष्मण माळी , (वय २५, दोघ रा. अयोध्यानगर) व्य यांच्या मुसक्या आवळल्या. ही त्यांच्याकडन चोरीची कार जप्त करण्यात आली आहे.

एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ओमनी कार चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील चोरयांना अटक करण्याच्या सूचना २ पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर त रेड्डी, चाळीसगाव विभागाचे अप्पर त्र पोलीस अधीक्षक कविता नेरकर, ग पोलीस उपअधीक्षक सुनिल नदंवाळकर यांनी स्थानिक गुन्हे ती शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जो किसन नजन पाटील यांना दिल्या होत्या. कार चोरी करणारे चोरटे नी हे अजिंठा चौफुली परिसरात कालीपीली चालवित असल्याची चे माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षकांना मिळाली. त्यांनी पथकाला संशयितांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने अजिंठा चौफुलीवरु न चंद्रकांत उर्फ गड्या चौधरी व विशाल माळी यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरलेली कार काढून दिले. . त्यांना पुढील कार्यवाहीसाठी एरंडोल पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोहेकॉ सुनिल दामोदरे, गोरख बागुल, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.