निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीत ग्रामसुरक्षा पथकाची स्थापना

रावेर प्रतिनिधी –राजेंद्र महाले— जळगाव जिल्ह्यातील वाढते गुन्हे लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी ग्रामीण भागातील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ग्राम सुरक्षा पथकाची स्थापना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार निंभोरा पोलीस निरीक्षक श्री गणेश धुमाळ साहेब यांनी आपल्या पोलिस स्टेशन हद्दीतील 29 गावांमध्ये ग्रामसुरक्षा पथकाची स्थापना करून त्यामध्ये 406 ग्रामसुरक्षा सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे महाराष्ट्र पोलीस स्टेशन येथे दि. १० रोजी पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा पथकाच्या सदस्यांची बैठक झाली छोट्या मोठ्या चोर्‍या, शेतमालाच्या चोऱ्या थांबविण्याकरिता, रात्री गस्त घालणे यासह सण-उत्सव अपघाताच्या वेळी पोलिसांना मदत करणे याबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले तसेच ग्राम सुरक्षा पथकाच्या सदस्यांना उपविभागीय पोलीस श्री कुणाल सोनवणे यांच्या हस्ते ओळखपत्र वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक श्री गणेश धुमाळ निंभोरा तंटामुक्ती अध्यक्ष श्री दिगंबर दादा चौधरी, प्रल्हाद भाऊ बोंडे पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील यांच्यासह ग्रामसुरक्षा पथक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते ग्राम सुरक्षा पथक स्थापन करणे कामी पोलीस नाईक श्री स्वप्निल दादा पाटील होमगार्ड अमोल अंजनसोंडे यांनी परिश्रम घेतले.