धरणगाव — येथील पष्टाणे खु. गावात नवदुर्गा मित्र मंडळाच्या पावन परिसरात अजिंक्यक्रांती फाऊंडेशन यांच्या वतीने “आजचा युवक उद्याच्या भारताचे भविष्य” या विषयावर प्रबोधनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरवातीला दुर्गा माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून वंदन करण्यात आले. तद्नंतर अतिथी मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करून कार्यक्रम सुरू झाला. प्रमुख अतिथी समाजसेवक नाना ठाकरे यांनी युवकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, तुम्ही तुमचे आई – वडील आणि गुरू यांच्यावर श्रध्दा ठेवा, तुम्हांला कधीच काही उणीव भासणार नाही. पुराण काळातील अनेक उदाहरणे देऊन त्यांनी युवकांची जबाबदारी सोदाहरण स्पष्ट केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी आजचा युवक उद्याच्या भारताचे भविष्य या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. छत्रपती शिवराय म्हणजे एक दैदिप्यमान आणि प्रखर तेजोमय असे अलौकिक व्यक्तिमत्त्व होय. युवक कसा असावा? समाज जीवनात वावरतांना युवकांनी योग्य आदर्श अंगिकारले पाहिजे नाहीतर आयुष्याची दिशा बदलू शकते. देशहित साधायचे असेल तर युवकांनी माणुसकी धर्म जोपासावा आणि आई वडिलांची सेवा करावी असा सल्ला लक्ष्मणराव पाटील यांनी दिला.
समारोप प्रसंगी युवकांचे आदर्श, माजी सरपंच किशोर निकम यांनी युवकांना काही मौलिक उदाहरणे देऊन अनमोल मार्गदर्शन केले. अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अजिंक्यक्रांती फाउंडेशन च्या सर्व युवक मित्रांचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक नाना ठाकरे व माजी सरपंच किशोर निकम, पं.स. धरणगावचे दिनेश भदाणे, विक्रम पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी सरपंच किशोर निकम, अजिंक्यक्रांती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदिप जाधव, शिवराजे ग्रुपचे अध्यक्ष अक्षय पाटील, ज्ञानेश पाटील, भावेश पाटील, योगेश पाटील, तेजस पाटील, विवेक जाधव, दुर्गेश जाधव, लोकेश ठाकरे, गणेश जाधव, अनिल जाधव, मयुर मराठे, चेतन पाटील, जयेश पाटील, पंकज पाटील, धिरज पाटील, अक्षय जाधव, सागर पाटील, निखिल देसले, संदीप पाटील, हेमंत पाटील, नितीन सूर्यवंशी, रुपेश वाघ, देवेंद्र पाटील, पियुष पाटील, हितेश पाटील, एकनाथ पाटील, गणेश पाटील रोहित नाईक, आकाश नाईक, नामू भिल्ल, भूषण पाटील, चिराग पाटील, पवन पाटील, कुंदन पाटील, बबलू पाटील आदी सर्वांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गावातील महिला भगिनी – पुरुष बांधव – युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अजिंक्यक्रांती फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अध्यक्ष संदिप जाधव यांनी तर आभार प्रदर्शन माजी सरपंच किशोर निकम यांनी केले.