मोहराळे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जीर्ण अवस्थेत आहे त्याची पुन्हा अर्धकृती पुतळा बसविण्याची मागणी..

दिपक नेवे

यावल तालुक्यातील मोहराळे येथील भारतरत्न व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा दिनांक २४/०४/१९८५ रोजी बसविण्यात आलेला आहे,मात्र आज त्या पुतळ्याची अवस्था जीर्ण झालेली आहे,म्हणून ग्रामपंचायत स्तरावर लवकरात लवकर याची दखल घ्यावी व त्या ठिकाणी नवीन स्वरूपात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कृती/ पुतळा बसविण्यात यावे अशा मागणीचे निवेदन भीम आर्मीच्या वतीने जिल्हा परिषदच्या सदस्या सौ . सविता अतुल भालेराव यांना देण्यात आले आहे. दरम्यान भीम आर्मीने दिलेल्या मागणी निवेदनात म्हटले आहे की मोहराळा येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा जिर्ण अवस्थेत असुन सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता येत्या एक महिन्यात आपण स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दखल घ्यावी व त्वरीत पुतळा दुरुस्तीचे कार्य करावे अन्यथा भिम आर्मी भारत एकता मिशन जळगांव जिल्हा युनिट व यावल तालुका युनिटच्या माध्यमातून मागणीनुसार निर्णय झाला नाही तर भीम आर्मीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे .
दरम्यान या संदर्भातील निवेदन
फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग व जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या पर्यंत आमच्या भावनांचे आदर करून मागणीचे निवेदन वरिष्ठापर्यंत पाठवून सदरील मागणीची पूर्तता करावी असे निवेदनात भीम आमीचे यावल तालुका गौरव सोनवणे यांनी म्हटले आहे . सदरच्या मागणी निवेदन देतांना भीम आर्मीचे प्रदेश सचिव सुपडु संदाशिव, यावलतालुका अध्यक्ष हेमराज तायडे, सचिन वानखेडे , गोविंदा सोनणने , सतिष अडकमोल, जय वानखेडे, कपिल अडकमोल, काशिनाथ अडकमोल, राहुल जयकर , पंकज डांबरे ,निखिल जोगी आदींच्या प्रामुख्याने उपस्थित होते .