मनोज जरांगे आजपासून राज्यव्यापी दौऱ्यावर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आजपासून जरांगेंचा राज्यव्यापी दौरा सुरू झाला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीमधील आंदोलना दरम्यान राज्य सरकाराच्या मुदतीस 14 ऑक्टोंबरला तीस दिवस पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून महाराष्ट्र राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे.

मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटी या गावातून सकाळी आठपासून या दौऱ्याला सुरुवात केलीये. आज अंबड शहरात एका कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, परतूर, मंठा, या जालना जिल्ह्यातील गावानंतर ते मंठा-परतूर मार्गे ते जिंतूर, परभणी, हिंगोली असा त्यांचा दौरा करणार आहेत.

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यात दौरा पूर्ण झाल्यानंतर 14 ऑक्टोंबरला आंतरवाली सराटी गावात जाहीर सभा घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे.

तर दुसरीकडे आज मराठा आरक्षणासाठी राज्यातील अनेक महसूल मंडळातून कुणबी असल्याच्या नोंदी तपासल्या गेल्यात. त्यात एक कोटींहून अधिक दस्ताएवज तपासले गेलेत. यात फक्त पाच हजार नोंदी आढळून आल्या आहेत. जालना जिल्ह्यात सर्वाधिक दोन हजार नोंदी आढळल्या आहेत. बीड जिल्ह्यात 1740, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 299, लातूर 47, नांदेड 50, हिंगोली 18,धाराशिव जिल्ह्यात 365 तर परभणी जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे फक्त 5 नोंदी आढळल्या आहेत.

त्यामुळे मराठा आरक्षणासाठी तीस दिवसांची मुदत मागणाऱ्या राज्य सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. मराठवाड्याचे आयुक्त देखील आज मुंबईत दाखल झाले असून दहा वाजता त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे.

या बैठकीदरम्यान सर्व जिल्हाधिकारी ऑनलाइन पद्धतीने या बैठकीला उपस्थित असणार आहेत. या सर्व नोंदी राज्य सरकारच्या समिती पुढे सादर करण्यात येणार आहेत. त्यातच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. त्यासाठी त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज जालना,परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यापासून राज्य व्या