जळगाव संदेश न्यूज नेटवर्क जळगाव – तालुक्यातील विदगाव रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपाच्या समोरील शेतात एका 31 वर्षिय तरुणाने गळफास घेतल्याने परिसरातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दि केली आहे. सदर घटना स्थळी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कल्याण कासार, मानिक सपकाळे, साहेबराव पाटील, ज्ञानेश्वर कोळी, सुधाकर शिंदे, जयेंद्र पाटील धाव घेतली.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि मयत तरुणाचे नाव जगदिश रुबजी बारेला वय 31 राहाणार विरवाडे ता चोपडा येथील असुन मयताचा भाऊ जगन बारेला याने दिलेल्या माहितीवरून जगदिश याला दारूचे व्यसन होते. तो सुमारे पाच सहा दिवसापुर्वि दारुच्या नशेत ओट्यावरून पडल्याने त्याचे डोक्याचे डावे बाजूस डोळ्याजवळ मोठी जखम झाल्याने व हातावर ओरखडे लागलेली असल्याने त्यास औषध उपचार साठी सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथे दाखल केले होते त्याच्या डोक्याला मार लागल्याने तो वेड्यासारखा करीत होता म्हणून मी त्यास काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास माझ्या मोटरसायकलवर घरी घेऊन जात असताना तो माझ्या मोटर सायकल वरून अचानक उतरून पळायला लागला मी त्याला अंधारामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला तो मला मिळुन न आल्याने मि घरी विरवाडा येथे निघुन गेलो.आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मी विदगाव कडे भाऊ जगदीश रुपजी बारेला याचा तपास करण्यासाठी आलो असता मला समजले की माझा भाऊ जगदीश याने एका शेतात गळफास घेतला आहे म्हणून तपास केला असता ते भावाचे प्रेत असल्याबाबत खात्री झाली असून भाऊ जगदीश रुपजी बारेला वय 31 याने त्याचे डोक्यात मार लागलेला असल्याने त्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याने त्यामुळे त्याने गळफास घेऊन मयत झालेले आहे. अशी माहिती मयताच्या भावाने दिली असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक कल्याण कासार यांच्या मार्गदर्शना खाली तालुका पोलीस स्टेशनचे माणिक सपकाळे, साहेबराव पाटील, हे करित आहे.