महाराष्ट्र वाल्मिकी मेहतर समाजाच्या महासचिव पदी गणेश बारसे यांची नियुक्ती!

भुसावळ – दिनांक १७ सप्टेंबर रोजी मुर्तीजापूर येथे महाराष्ट्र राज्य मेहतर वाल्मिकी समाज अर्थात बावनी पंचायत महाराष्ट्र राज्याची चिंतन मंथन सभा संपन्न झाली. या वेळी वेगवेगळ्या शहरातून आलेल्या समाज बांधवां मधून राज्य कार्यकारिणी घोषित करण्यात आली त्यात भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते गणेशजी बारसे यांची महाराष्ट्र महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी समाजाचे अध्यक्ष संतोषजी बारसे, कार्याध्यक्ष किशोरजी पिवल, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषजी पवार व सन्माननीय सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. महासचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल गणेशजी बारसे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.