महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE -136 जळगाव तालुका कार्यकारणी निवडणूक संपन्न,,

जळगाव-: महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जळगाव तालुकाध्यक्षपदी – बबन वाघ, सचिव पदी – चंद्रकांत जयकर यांचे एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. जळगाव येथे दिनांक- 16 रोजी पंचायत समिती कार्यालय सभागृहात ग्रामसेवक संघटनेचे नुकतीच बैठक पार पडली. सकाळी अकरा वाजता नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, छाननी,माघार व दुपारी दोन वाजता मतदान झाले. अध्यक्ष- बबन वाघ, सचिव चंद्रकांत जयकर , उपाध्यक्ष – भूपेश पाटील,स्वाती पाटील, सहसचिव – किशोर चौधरी, तालुका संघटक – नितीन चौधरी,पल्लवी मोरे, प्रसिद्ध प्रमुख – दिलीप सपकाळे, जिल्हा प्रतिनिधी – देवानंद सोनवणे यांची निवड एकमेव अर्ज आलेने बिनविरोध झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून – उल्हासराव जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी – रमेश पवार यांनी काम पाहिले. यावेळी – जे. ऐ.चिंचोरे, एस.एल. बाभूल, डी.के.सोनवणे, सी.बी.जयकर, डी. एस.सोनवणे,व्ही. ऐ.चिमणकारे, डी. एल. सपकाळे, ऐ. जी. साठे, एन. जी. चौधरी, एस. डी. पाटील, पी. ऐ. मोरे, एस. एन. अत्तरदे, बी. आर. वाघ, आर. एस. महाजन, बी. बी. कोळी, भूपेश पाटील, नरेंद्र साळूंके, सतीश पाटील, एस. एस. पाटील, सी. पी. वराडे, डी. जे. पाटे, के. पी. चौधरी, एस. व्ही. पवार, के. ऐ. पवार, एन. के.येशिराया आदी ग्रामसेवक मोठ्या संख्येने हजर होते.