भुसावळ – येथील व परिसरातील काही गावांमध्ये नागरीकांनी खाजगी कर्ज कंपनीच्या माध्यमातून कर्ज घेतले आहे त्यामुळे दर महिन्याला मासिक हप्ता भरावा लागतो.मात्र बऱ्याचदा वैद्यकीय किंवा इतर कामामुळे हप्ता भरण्यासाठी वेळ लागतो . विशेष म्हणजे एखादा कर्ज हप्ता भरण्यासाठी वेळ लागला तर त्या रक्कमेवर दंड आकारण्यात येतो.एखादी व्यक्ती दंड भरण्यास तयार असून सुद्धा रक्कम आताच भरावी लागेल अन्यथा आम्ही तुमच्या घरा जवळ बसू नाहीतर मोबाईल घेऊन जाऊ तसेच तुमच्या घराजवळ आरोळ्या मारु आणि तुमचा कमीपणा करु अशा धमक्या देऊन अरेरावीची भाषा वापरतात.विशेष करुन बजाज फायनान्स कंपनी च्या कर्मचाऱ्यांबद्दल लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
एखादी व्यक्ती दंड भरायला तयार असून ही धमक्या का दिल्या जातात.या बाबत चौकशी करून संबंधितांवर कंपनीने कारवाई करणे गरजेचे आहे असे बोलले जात असून बजाज फायनान्स कंपनी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.