सुनसगाव – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव तालुका विधी सेवा समिती भुसावळ व तालुका वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामपंचायत कार्यालयात कायदे विषयक माहिती देण्यात आली यावेळी अॅड. बोहरा तसेच प्राचार्य खान सर यांनी यावेळी बोलतांना अॅड. बोहरा म्हणाले की लोक अदालत वेळी गावातील कोणत्याही नागरिकाला वकिलाची गरज भासल्यास आम्ही आपणास कोणत्याही प्रकारचा मोबदला फी न घेता मोफत मदत करु तसेच न्यायालयाच्या कोणत्याही कामासाठी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी वृक्ष लागवड तसेच पाणी आडवा पाणी जिरवा अशा अनेक गोष्टी बाबत माहिती दिली.यावेळी सरपंच दिपक सावकारे , ग्रामसेवक आर व्ही घुले , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.