भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व, जळगाव शहर शाखा, जळगाव तालुका शाखा यांच्यावतीने आज ३ ठिकाणी वर्षावासाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

जळगाव -सर्वप्रथम यशवंत भवन, वाघ नगर, बुद्ध विहारांमध्ये बुद्ध पूजा करून वर्षावासाचे उद्घाटन करण्यात आले. वर्षावासाचे उद्घाटन जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष शैलेंद्र जाधव यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव शहराचे शहर अध्यक्ष डॉ. अनिल शिरसाळे होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा कोषाध्यक्ष बी. एस. पवार, जळगाव तालुका अध्यक्ष जगदीश सपकाळे, जिल्हा पर्यटन सचिव सुभाष सपकाळे, बुद्ध विहार व्यवस्थापक विलास तायडे उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा कार्यालयीन सचिव आनंद ढिवरे यांनी केले.

त्यानंतर बिबा नगर जळगाव येथे आयु. नाना वानखेडे यांच्या राहत्या घरी बुद्ध पूजा करून वर्षावासाचे उद्घाटन करण्यात आले. वर्षावासाचे उद्घाटन जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष शैलेंद्र जाधव यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव तालुका अध्यक्ष जगदीश सपकाळे होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा कोषाध्यक्ष बी. एस. पवार, जिल्हा संस्कार विभाग सचिव रवींद्र वानखेडे, जिल्हा पर्यटन विभाग सचिव सुभाष सपकाळे, केंद्रीय शिक्षिका सुनीताताई वानखेडे उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा कार्यालयीन सचिव आनंद ढिवरे यांनी केले.

त्यानंतर टाहकळी या गावामध्ये आयु. बापू सदावर्ते यांच्या राहत्या घरी बुद्ध पूजा करून वर्षावासाचे उद्घाटन करण्यात आले. वर्षावासाचे उद्घाटन जिल्ह्याचे कोषाध्यक्ष बी. एस. पवार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा संस्कार विभाग सचिव रवींद्र वानखेडे होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा पर्यटन विभाग सचिव सुभाष सपकाळे, केंद्रीय शिक्षिका सुनीताताई वानखेडे, आयु. नाना वानखेडे उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा कार्यालयीन सचिव आनंद ढिवरे यांनी केले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh