इस्लामिक प्रथा लागू करणाऱ्या शाळेवर मध्य प्रदेश सरकारच्या वतीने कडक कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कारवाईच्या आदेशानंतर आता गंगा जमुना शाळेवर बुलडोझर चालवण्यात येणार आहे. पालिकेने रविवारी शाळेला नोटीस पाठवली आहे. परवानगीशिवाय शाळेची इमारत बांधण्यात आल्याचा आरोप करत पालिकेने शाळेकडून तीन दिवसांत उत्तर मागितले आहे. हिंदू मुलींना हिजाब घालायला लावल्याने व धर्मांतराचे प्रयत्न केल्याने प्रशासनाने शाळेशी संबंधित लोकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. शाळाचालकांच्या व्यवसायावरही छापे टाकण्यात येत आहेत. त्यांची पेट्रोल पंपासह अनेक दुकाने सील करण्यात आली आहेत.
दमोह जिल्ह्यात असलेल्या वादग्रस्त गंगा जमना शाळेचे हिजाबपासून सुरू झालेले प्रकरण धर्मांतर आणि टेरर फंडिंगच्या आरोपांपर्यंत पोहोचले आहे. रविवारी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि चौकीदाराला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. दरम्यान, आता प्रशासनाने शाळेवर बुलडोझर चालवण्याची तयारी केली आहे. दमोह नगरपालिकेने गंगा जमुना शाळेच्या नावाने नोटीस बजावली आहे.