ज्ञानाचे व संस्काराचे दान करणारे खरे आचार्य आई-वडीलच… ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांचे प्रतिपादन….

हेमकांत गायकवाड

चोपडा : जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी ज्ञान व संस्काराचे शिक्षण देणारे आई – वडील हेच खरे आचार्य आहेत .याविषयी सर्व मुला-मुलींना जाण असली पाहिजे असे प्रतिपादन तावसे बु!! तालुका चोपडा येथे वैकुंठवासी अमृत काशीराम चौधरी व वैकुंठवासी ग भा मंदोदरी अमृत चौधरी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन ह. भ. प नरहरी महाराज चौधरी सचिव वारकरी महामंडळ महाराष्ट्र यांनी आ केले होते त्या प्रसंगी ते बोलत होते.

सदर महोत्सवात प.पूज्य ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा मंदिर श्री क्षेत्र देहू काय नोहे केले एका चिंतीतविठ्ठले !! आई-वडिलांच्या सेवेतून व भगवंतांच्या नामस्मरणातून भगवंत प्राप्त होऊ शकतो. पुंडलिकराय व संतांचे उदाहरण देत त्याने आई-वडिलांच्या सेवेचे व भगवत नामस्मरणाचे महत्त्व उपस्थित श्रोत्यांना पटवून दिले. ह.भ.प.भरत महाराज पाटील प्रमुख सद्गुरु झेंडुजी महाराज परंपरा यांनी उपकारासाठी केले हे उपाय या अभंगातून आपणास अमुल्य स्वरूपाच्या मानव देह मिळूनही आपण संसारात आणि विषयांच्या खाड्यांमध्ये एवढे बुडून जातो आणि खऱ्या हितापासून दुरावत आणि मानवी देहाच्या विनाश करतो.

तीन दिवसीय कीर्तन महोत्सवातील काल्याचे किर्तन प. पूज्य ह. भ. प. भरत महाराज चौधरी झी टीव्ही मनमंदिराचे उत्तम कीर्तनकार यांनी काकुलता येतो हरी क्षणभरी निवडीत !! या काला प्रकरणातील अभंगावर निरूपण करताना भगवान कृष्णाचे महत्व सांगत आपले सवंगडी अनुकूल नसतील तर संघटना अबाधित राहत नाही म्हणून लहान-मोठा ,कमी-जास्त असा भेदभाव न करता घराचे घरपण व गावाचे गावपण टिकवताना हा लहान मोठेपणा न ठेवता सत्य हेच समोर असले पाहिजे व तसे घडले नाही तर देवही काकुलतीला येतो असे खूप चिंतन सुंदर सांगत श्रीकृष्णाचे चरित्र उत्तम सांगितले.

सर्व कीर्तनकारांनी आई वडिलांचे महत्त्व सांगत संत वचनच्या माध्यमातून अनेक उदाहरणे देत युक्ती प्रयुक्तीने आई वडिलांचे महत्त्व पटवत उपस्थित ग्रामस्थांना आणि पंचक्रोशीतील भाविकांना मंत्रमुग्ध केले .तरुण मुला-मुलींना आई वडिलांच्या विषयी जिव्हाळा आपुलकी असली पाहिजे. आई वडील वयस्कर असले तरी त्यांच्यावर रागवू नये कारण आई वडिलांचे मार्गदर्शन व आशीर्वादाने आपले जीवन सुखी व समृद्ध होत असते म्हणून परिस्थिती कशीही असली तरी वृध्दआईवडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवून आपल्या संसाराची वाट लावू नका तर त्यांची सेवा करत आपले आहिक व पारलौकिक जीवनात स्थैर्य व धैर्य येऊ शकते म्हणून तरुणांनी हे लक्षात ठेवत आचरणात आणले पाहिजे .त्याशिवाय प्रत्येकाच्या संसार सुखी व समाधानी होऊ शकत नाही .

याप्रसंगी वारकरी संप्रदायाचे थोर कीर्तनकार व गायक प.पूज्य आबासाहेब गोडसे पुणे रामचंद्र महाराज सारंग हिंगोली, जनार्दन महाराज अमळनेर, सुनील महाराज पारोळा ,अंकुश महाराज यावल ,ज्ञानेश्वर महाराज वसमतकर, डालेंद्र महाराज, कैलास महाराज, भुषण पाटील जळगाव, गजानन महाराज बेळीकर ,जगन्नाथ महाराज, भानुदास महाराज ,वासुदेव पाटील कुरवेलकर आदी उपस्थित होते.

या कीर्तन महोत्सव प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख तात्या पाटील यांच्या हस्ते कीर्तनकार महाराजांचे पूजन करण्यात आले. कीर्तन महोत्सवाचे आयोजन यशस्वीतेसाठी अशोक अमृत चौधरी, धनराज अमृत चौधरी, विवेक धनराज चौधरी आदींनी परिश्रम घेतले.