ग्रामसेवकाने शासनाची केली पाच लाख 58 हजारांत फसवणूक

जळगाव – तालुक्यातील उमाळा येथील ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक यांनी पाणीपट्टी घरपट्टी ओरिजनल पावती पुस्तकात, ग्रामनिधी मध्ये व बनावट पावती पुस्तक वापरून 5 लाख 58 हजार पाचशे सहा रुपयांचा बँकेत भरणा न करता अपहार केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात ग्राम विस्तार अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव तालुक्यातील उमाळा या ठिकाणी तत्कालीन ग्रामसेवक संदीप चंद्रभान निकम हे असताना त्यांनी पाणीपट्टी व घरपट्टी याच्या ओरिजिनल पावती पुस्तकांमध्ये पाणीपुरवठा वसुलीमध्ये सहाशे रुपये ग्रामनिधी मध्ये चार लाख 14 हजार 400 रुपये तसेच बनावट पावती पुस्तक चा वापर करून एक लाख 43 हजार पाचशे सहा रुपये असा एकूण पाच लाख 58 हजार पाचशे सहा रुपयांचा रकमेचा भरणा बँकेत न करता त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला व अपहार केला. या प्रकरणी राजेश धोंडू इंगळे विस्तार अधिकारी पंचायत समिती जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन ग्रामसेवक संदीप निकम यांच्याविरुद्ध फसवणूक तिचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गणशे करीत आहेत.