महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या मुलींसाठी आनंदाची बातमी, 100 टक्के फी माफ होणार?

मुंबई – राज्यातील ओबीसी आणि आर्थिक मागास वर्गातील मुलींसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील ओबीसी आणि आर्थिक मागासातील मुलींसाठीची 100 टक्के फी माफ करावी, अशी शिफारस चंद्रकांत पाटील करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच चंद्रकांत पाटील यांना तसा प्रस्ताव देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील याबाबत शिफारस करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयानंतर 642 कोर्सेससाठी 1 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीची तरतूद करावी लागणार असल्याची माहिती समोर आलीय.

परभणी येथे एका तरुणीने टोकाचा निर्णय घेतला. या तरुणीने फीसाठी पैसे नसल्यामुळे स्वत:चं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. तिने सुसाईड नोट लिहिली होती. त्यात तिने “माझी 50 टक्के फी सरकार भरत आहे. त्याबद्दल मी सरकाचे आभार मानते. पण उरलेली 50 टक्के फी भरायला माझ्या पालकांकडे पैसे नाहीत”, असं लिहिलं होतं. ही घटना मुख्यमंत्र्यांच्या मनाला चटका लावणारी ठरली. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ओबीसी आणि आर्थिक मागासातील मुलींसाठीची 100 टक्के फी माफीचा प्रस्ताव द्यायला सांगितला आहे. हा प्रस्तव लवकरच दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा आरक्षण उपसमितीची मंत्रिमंडळाची बैठक संपन्न

दरम्यान, मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यानी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारकडून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. सरकारकडून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून किती हजार कोटींच्या रुपयांची तरतूद करण्यात आलीय, याविषयी सविस्तर विश्लेषण चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केलं.

jalgaonsandesh

jalgaonsandesh