आदिवासी जमातींच्या मुंबई उपोषणाची शासनाने घेतली दखल

१५ दिवसात माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले  आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने डॉ. दशरथजी भांडे साहेबयांच्या नेतृत्वात आदिवासी अन्यायग्रस्त जमातींचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले या उपोषणाला राज्यांचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री मा. गुलाबराव पाटील साहेब व सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री मा. अतुलजी सावे साहेब शासनाने प्रतिनिधी म्हणून उपोषणा ठिकाणी येऊन उपोषणकर्तेची भेट घेतली व मागण्यांबाबत शासन निश्चितपणे योग्य तो निर्णय घेईल व लवकरच राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब व माननीय उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले .या राज्यव्यापी उपोषणात महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त आदिवासी कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने बसले होते

या उपोषणाला डाॅ . दशरथजी भांडे , राज्य निमंत्रक अकोला जिल्हाध्यक्ष प्रशांत तराळे , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे , प्रमुख मार्गदर्शक श्यामजी सोनकुसरे, मनोहरराव बुध, एकनाथराव जूवार संजय भाऊ कांडेलकर , सुनिता ताई तायडे,सौ. प्रिती शिंदेकर जयदीप तांडेल, सोपानराव मारकवाड, हरिभाऊ नंदनवार प्रा संजय मोरे राकेश कुंभारे, प्रा. मोतीलाल सोनवणे संजय कोळी, अँड नारायण जांभुळे , अशोक कळमकर, गजानन कासमपुरे, गजानन चुनकीकर संजय महाले कैलास सोनवणे केदार एस एम लखोपुरिया , नंदकिशोर रायबोले, सुभाष वरसोली, संजय हेडाउ कविता सोनवणे, देविदास तायडे योगेश कोळी, भगवान कोळी सविता ताई कोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या उपोषणाला नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा, आदिवासी कॄती सामाजिक समन्वय संस्था मुंबई, हलबा मैत्रिणी ग्रुप , आदिवासी विकास संघ , अखिल भारतीय कोली समाज दिल्ली, आदिवासी कोळी महादेव कर्मचारी संघटना, खंडोबा देवस्थान अलिबाग, सर्व शक्ती सेना महाराष्ट्र प्रदेश, आदिवासी हलबा समाज सेवा मंडळ कल्याण, वसई हलबा समाज सेवा मंडळ, आदिवासी माना समाज समिती विदर्भ , मन्नेवार मनैरवारलू समाज सुधारक मंडळ नांदेड यांच्या सह महाराष्ट्रातील आदिवासी जमाती संघटनांनी जाहीर पाठिंबा देऊन उपोषणात सहभाग घेतला होता .

अकोला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व राज्याचे निमंत्रक श्री प्रशांत भाऊ तराळे यांनी गेल्या पंधरा दिवसांमध्ये सेवानिवृत्त पेन्शन कर्मचाऱ्यांच्या थांबवलेल्या पेन्शन बाबत एक लढा लढण्याचा निर्धार व्यक्त केला व या लढ्याला सुरुवात करण्याची जबाबदारी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे श्यामजी सोनकुसरे, संजय कांडेलकर यांनी इतर पदाधिकार्यांऱ्याच्या माध्यमातून फक्त पंधरा दिवसांमध्ये या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह, लढण्याची बळ निर्माण केले, तुम्हाला लढावेच लागेल न्याय नक्कीच मिळेल अशा आत्मविश्वास दिली आणि गेल्या पंधरा दिवसातच बेमुदत उपोषण आंदोलनाची रणनीती आखली जबरदस्त नियोजन प्रशांत भाऊ तराळे यांनी अतिशय कुशल बुद्धीने अत्यंत हुशार पद्धतीने केले प्रल्हाद सोनवणे जळगाव यांनी सतत फेसबुक व्हाटसाॅफ , ग्रुप प्रसार माध्यमे, यु टयुब चॅनल समक्ष भेटून फोन वर चर्चा करून सहभागी व्होवून जाहीर पाठिंबा देण्यासाठी आवाहन केले व अनेक आदिवासी कोळी संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आदिवासी नेते

डॉ दशरथ भांडे साहेब यांनी या उपोषणात सांगितले की १९७६ च्या मा. राष्ट्रपतींनी अधिसूचित केलेल्या अनुसूचित जमातीच्या यादीनुसार महाराष्ट्रातील १ कोटी आदिवासी अनुसूचित जमातीच्या सर्व सोयी सुविधांना पात्र असुन सुद्धा आदिवासी विकास विभाग वेगवेगळे षडयंत्र करून या १ कोटी आदिवासींना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवत आहे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळूच देत नाही यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारमय झाले आहे तरी या १ कोटी आदिवासींना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, ३०-३५ वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने अधिसंख्य पदावर वर्ग करणारा दि. २१/१२/२०१९ रोजी अधिसंख्य पदाचा अन्याय कारक शासन निर्णय घेण्यात आला यामुळे कर्मचारी मानसिक तनावात आहे तरी हा शासन निर्णय रद्द करून अधि संख्य केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पुर्वरत करून सेवा निवृत्त पेन्शन, कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पुर्वरत करून वेतनवाढ, पदोन्नती इतर लाभ देण्यात यावे आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाबाबत विरोधकांवर जोरदार हल्ला चढविला सामान्य प्रशासन , आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांचेही कारस्थाने यावेळी मांडले . मुंबई आझाद मैदानावर सकाळी ७.३० वाजे पासुनच प्रशांत भाऊ तराळे अकोला जिल्हाध्यक्ष प्रल्हाद भाऊ सोनवणे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्याम जी सोनकुसरे साहेब संजय भाऊ कांडेलकर हे उपोषण यशस्वी करण्यासाठी कामाला लागले होते

शिवसेनेचे पाणी पुरवठा मंत्री मा . गुलाबराव पाटील व भाजपा चे सहकार मंत्री मा. अतुलजी सावे शासनाचे प्रतिनिधी म्हणून आझाद मैदानावर येऊन उपोषणकर्तेची भेट घेतली व लवकरच राज्याचे माननीय मुख्यमंत्री  श्री. एकनाथ शिंदे साहेब , माननीय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सोबत या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी पंधरा दिवसात बैठक घेणार असल्याचे सांगितले आपण उपोषण मागे घ्यावे अशी हि विनंती या विनंतीला उपोषणकर्तेनी प्रतिसाद दिल्याने हे लाक्षणिक उपोषण मागे घेण्यात आले .मा प्रशांत भाऊ तराळे ,प्रल्हाद सोनवणे ,संजय कांडेलकर, कैलास सोनवणे यांनी आखलेली नियोजन बद्ध रणनिती न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने दि. १५ सप्टेंबर ला सकाळी ८ वाजता पाणी पुरवठा मंत्री मा. गुलाबराव पाटील  यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व मागण्यांबाबत माहिती दिली , १० वाजता मंत्रालयात जावून सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री  मा. अतुलजी सावे साहेब यांच्या कार्यालयात उपोषणाबाबत सविस्तर चर्चा करून उपोषणात ठिकाणी शासनानेचे प्रतिनिधी म्हणून यावे असे सांगितले याच ठिकाणी माजी विरोधी पक्षनेते आमदार मा. प्रविण दरेकर यांचीही भेट घेतली कॅबिनेट मंत्री मा. संदिपान भुमरे साहेब यांना हि निवेदन देण्यात आले तसेच या उपोषणाला भाजपा नेते तथा ग्राम विकास मंत्री मा. गिरीष भाऊं महाजन जळगाव महानगरचे आमदार मा. राजु मामा भोळे मुक्ताईनगर चे आमदार मा. चंद्रकांत भाऊ पाटील यांनी ही पाठिंबा दिला

या समाजाप्रती केलेल्या कुशल कामगिरी मुळे एकाच दिवसाच्या आंदोलनात शासनाला आपले प्रतिनिधी पाठवावे लागले .आदीवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती चे नेते , राज्य पदाधिकारी सर्व महिला पुरुष जिल्हाध्यक्ष , तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आझाद मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावून आपली आपली जवाबदारी पार पाडत होते.  मा. श्याम जी सोनकुसरे साहेब,व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद भाऊ सोनवणे यांनी संपुर्ण दिवसभर मंचावरील सर्व नियोजन सांभाळले

jalgaonsandesh

jalgaonsandesh