कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्रासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांची तब्बेत खालावली

जळगाव – येथील कोळी समाजाला जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी पासून जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी बांधवांनी जातीचे दाखले मिळत नाही तोपर्यंत अन्नाचा त्याग केलेला आहे. त्यातच आज उपोषणाला सोळावा दिवस असल्याने उपोषणकर्त्यांपैकी श्री जगन्नाथ बाविस्कर यांची तब्येत खालवल्याची माहिती समोर आली आहे.

सलग सोळा दिवसापासून अन्न त्याग केल्यामुळे जगन्नाथ बाविस्कर यांच्या रक्ताची पातळी कमी झाल्याची माहिती आहे दरम्यान डॉक्टरांचे एक पथक उपोषणास्थळी दाखल झाले असून जगन्नाथ बाविस्कर यांच्यावर उपचार सुरू केले जात आहे.

कोळी समाजाला सरसकट जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जगन्नाथ बाविस्कर यांचे सह कोळी समाजाचे सात शिलेदार उपोषणाला बसलेले आहेत.

आज त्यांच्या उपोषणाला सोळावा दिवस असून हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे बाविस्कर यांनी सांगितले “मेलो तरी चालेल” अशी भूमिका कोळी बांधवांनी घेतली आहे.

दरम्यान जगन्नाथ बाविस्कर यांनी राज्य सरकारला कोळी समाजाला सरसकट जात प्रमाणपत्र देण्यासाठी जी आर काढावा त्यानंतर उपोषण सोडण्याबाबत विचार केला जाईल असा इशारा देखील कोळी समाजाच्या उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

कोळी समाजाचे उपोषण मागे घ्यावं यासाठी मंत्री उपोषण स्थळी आले होते मात्र गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, किशोर पाटील, यांना उपोषणकर्त्यांचे मन वळवण्यात अपयश आले आहे.

सरकार लवकरात लवकर जी आर काढणार असल्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले मात्र तरी देखील कोळी बांधव मागे हटले नाही. दरम्यान राज्यातील विरोधी पक्षाचे अनेक मोठे नेते जळगावात येऊन कोळी समाजाच्या उपोषणाला भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

तरी राज्य सरकारने लवकरात लवकर जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी जीआर काढावा असे कोळी बांधवांकडून मागणी होत आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh