ममुराबाद सह परिसरातील शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने हतबल

ममुराबाद – : चारही बाजूने जंगलाने वेढलेल्या ममुराबाद, असोदा, सुजदे, नांद्रा, धामनगाव, खापरखेडा, परिसरातील शेतांमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव गेल्या वर्षांपासून वाढला आहे. तृणभक्षी प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होत असून हिस्त्र प्राण्यांची शेतकऱ्यात भीती निर्माण झाली आहे. या वन्यप्राण्यांचा वनविभाग बंदोबस्त करीत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. स्वत:हून बंदोबस्त करावा तर वनविभागाच्या कायद्यात अडकण्याची भीती असते.

रानडुक्कर, सांबर, निलगाय, हरीण आदी प्राणी बिनधास्त शेतशिवारात शिरतात. सध्या कापुस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. त्या कापुसाच्या पिकाचेही हरीन तसेच सांबर मोठे नुकसान करीत आहे.सध्या शेतशिवारात भाजीपाला पीक मोठ्या प्रमाणात उभे आहे. त्यावर तृणभक्षी प्राणी ताव मारताना दिसून येत आहे. यात शेतकºयांचे मोठे नुकसान होते.

जंगलातील जलस्त्रोत कमी झाले की, सहज मिळणाºया पाण्याच्या शोधात प्राण्यांचे कळप शेतात शिरतात. या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकºयांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. परंतु त्यालाही वन्यप्राणी जुमानत नाही.त्यामुळे अनेक शेतकरी आता वनविभागाकडे धाव घेत आहे. परंतु वनविभागाचे कर्मचारी या वन्यप्राण्यांना शेतापासून दूर पिटाळण्यासाठी कधीच प्रयत्न करताना दिसत नाही.परिणामी शेतकर्‍याना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. लवकरात लवकर वनविभाने वन्य प्राण्यांचा बदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन केली जात आहे .