अल्पवयीन तरुणांची चमकोगिरी
भुसावळ – महिन्याच्या प्रत्येक शनिवारी अनेक भागातील भाविक श्री क्षेत्र हनुमान मंदीर शिरसाळा येथे दर्शनासाठी जातात मात्र यात काही टारगट तरुण हौस म्हणून मोटरसायकल घेऊन भन्नाट वेगाने जातात या प्रकारामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबत माहिती अशी की, जळगाव कडून काही अल्पवयीन तरुण ट्रिपल सीट मोटरसायकल घेऊन दर्शनासाठी जात असतात. मात्र या मोटरसायकल एवढ्या वेगाने चालवतात की एखादी रेस सुरू आहे काय असे वाटते.
विशेष म्हणजे आता शेती शिवारात शेतकरी बैलगाडी घेऊन जातात एखाद्या वेळी या मोटरसायकल स्वारांनी वाहन चालवताना काळजी नाही घेतली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. अशा प्रकारची रेस लावणारे हे सर्व अल्पवयीन आहेत या तरुणांकडे वाहन चालवण्याचा परवाना सुध्दा नाही त्यामुळे आपला मुलगा देवदर्शन करण्यासाठी निघाला असेल तर किमान मोटरसायकल कशी चालवतो याची काळजी पालकांनी घेणे आवश्यक आहे.