जळगाव – जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील माजी सैनिकाच्या मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साडेआठ लाख रुपयांत फसवणूक केली. याप्रकरणी जामनेर पोलिसांत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथे राहणारे माजी सैनिक रघुनाथ रामदास न्हावकर यांना सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी येथे राहणारे सुधाकर मधुकर मोटे यांनी तुमच्या मुलाला भू अभिलेखन येथे नोकरी लावून देतो. असे सांगून ऑनलाइन रोख आठ लाख 50 हजार रुपये घेतले व नोकरी न लावता त्यांची पैसे घेऊन फसवणूक केली. याबाबत रघुनाथ न्हावकर यांनी जामनेर न्यायालयात फौजदारी दाखल केली होती न्यायालयाच्या आदेशाने जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.