दहीगाव नायगाव शेतरस्ता दुरूस्त करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या यांची आरोग्य व शिक्षण सभापती पाटील कडे मागणी

दिपक नेवे

दहीगाव ते नायगाव मार्गावरील शेत रस्त्याची दयनिय अवस्था झाली असुन, पाउसामुळे तर अधिकच बिकट झाल्याचे चित्र आहे, या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सावखेडा सिम हिंगोणा गटाच्या जिल्हा परिषदच्या सदस्या सविता अतुल भालेराव आणी दहीगाव ग्रामपंचायत सदस्य शेलेन्द्र सुरेश पाटील, आखिल भारतीय छावा संघटनेच्या युवा शाखाचे अध्यक्ष चंद्रकांत गोकुळ पाटील यांनी जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती रविन्द्र सुर्यभान पाटील ( छोटु भाऊ ) यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे . या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , दहीगाव ते नायगाव सुमारे दोन किलोमिटरच्या या मार्गावरील रस्त्याची अत्यंत दयानिय अवस्था झाली असुन हा शेतीरस्ता रस्ता शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा दळणवळणाचे साधन म्हणुन ओळखला जातो , यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती रविन्द्र पाटील यांनी निवेदनकर्त्यांना सांगीतले की आपण तात्काळ कामाला सुरूवात करून शेतस्त्याच्या कामास पुर्ण करू असे आश्वासन दिले व जिल्हा परिषदच्या निधीतुन कामास पुर्णत्वास घेवुन जावु असे ही त्यांनी यावेळी निवेदनकर्त्यांशी बोलतांना सांगीतले . याप्रसंगी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे उपस्थित होते