सुजदे येथे वाघाच्या हल्ल्यात गाय ठार, वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव – तालुक्यातील सुजदे गावात गेल्या आठ दिवसापुर्वी काही तरुणांना घरी जात असताना वाघ दिसला. परंतु गावातील नागरीकांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. परंतु गेल्या चार दिवसापूर्वी सुजदे येथील रहिवाशी सखाराम सोनवणे यांच्या गाईवर वाघाने झडप घातली आणि तीला जागीच ठार केले.

वाघाच्या हल्ल्यांमुळे  जीवीत हानी तर होतच आहे. सोबतच शेतक-यांचे पाळीव जनावरेही वाघ फस्त करण्याच्या तयारीत असल्याने शेतक-यांना आर्थिक संकटांना समोरे जावे लागत आहे. पाळीव जनावरांवर वाघ हल्ला करित असल्याने आता करायचे तरी काय असा प्रश्न गावक-यांसमोर उभा ठाकला आहे.

वनविभागाने पाळत ठेवावी

सध्या शेतांमध्ये गहु, बाजरी, मका, ज्वारी, या पिकांची लागवड केलेली असल्याने त्या पिकांना पाणी देण्यासाठी रात्री बेरात्री शेतकऱ्यांना आपल्या शेतात जावे लागते. गाईवर हल्ला चढवलेल्या घटनेमुळे शेतकऱ्यांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी या होणा-या वाघांच्या हल्ल्यावर वनविभागाने संबंधित ठिकाणी पाळत ठेवून सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, विविध परिसरात जनजागृती करण्याची गरज असल्याचे समोर आले आहे.

आता वाघाचा मानवावर हल्ला होऊ नये त्यासाठी लगेच यावर योग्य ती उपाययोजना न केल्यास घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही