जि.प. व पं.स.च्या निवडणूकीसाठी गट-गण रचना ३० नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करा.

मुंबई -दि.२०: राज्यातील मार्च २०२२ मध्ये मुदत संपत असलेल्या प.स. जि.प.च्या निवडणुकांसाठी गट, गण रचना ३० नोव्हेम्बरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.प.स., जि.प.च्या निवडणुकांसाठी गट, गण रचना अंतिम झाल्यानंतर आरक्षणासाठीच्या सोडती होणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या तारखा जाहीर होतील. आता प.स.जि.प. च्या निवडणुकांसाठी गट, गण रचना अंतिम करताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्या त्या जिल्ह्यांची २०२१ सालातील जनगणनेनुसार लोकसंख्या विचारात घ्यावी अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार आता प.स.जि.प.च्या निवडणुकांसाठी गट, गण संख्येत वाढ होऊ शकते असा राजकीय पक्षांचा अंदाज आहे.प.स. जि.प.च्या निवडणुकांसाठी गट, गण संख्या, ओबीसीसाठी द्यावे लागणारे आरक्षण व एकूण आरक्षणाचे ५० टक्के प्रमाण विचारात घेऊन ही कार्यवाही होणार असली तरी ती न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. आरक्षण निश्चिती आणि सोडतीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे राज्य निवडणूक आयोगाकडून राज्याच्या प्रशासनाला दिला जाणार आहे, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आरक्षणाच्या सोडती जाहीर होण्याची शक्यता आहे. आरक्षण सोडती जाहीर होईपर्यंत गट आणि गणांची रचना गोपनीय ठेवली जाणार आहे. गट आणि गणांच्या नव्या रचनेला संबंधित विभागीय आयुक्त मान्यता देणार आहेत.