मौजे बल्लाळचे स्वस्त धान्य दूकानदाराकडून धान्य मिळेना;शिधापत्रीकाधारकांची तक्रार

प्रतिनिधी – दत्ता बोईनवाड

भोकर – मागील वर्षभरापासून बल्लाळ च्या स्वस्त धान्य दूकानचालकाने गावातील शिधापत्रीकाधारकांना धान्य देत नाही परिणामी अंतोदय बिपीएल लाभार्थ्यांना शासनाच्या मोफत धान्यापासून वंचित रहावे लागत आहे.

मौजे बल्लाळ येथील स्वस्त धान्य दूकानदारांचे पती अशोक पांडूरंग हिरे यांनी स्वस्त धान्य दूकानाचा कारभार पहातात याबाबत विचारणा केल्यावर नागरीकांना उध्दटपणाने बोलतात कूणालाही न जूमानता आरेरावीची भाषा वापरतात या प्रकरणी वेळोवेळी स्वस्त धान्य दूकानदारांची पूरवठा विभागाकडे तक्रार करुनही यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही सदर दूकानांची चौकशी करण्यात यावी अन्यथा दि.३ आँक्टोबर पासून बल्लाळ येथील धान्यापासून वंचित असलेले शिधापत्रीकाधारक आमरण उपोषण करणार असल्याचा ईशारा तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदनावर मरीबा गाडेकर पोशट्टी उरुडवाड आत्माराम जाधव दिगंबर हिरे भगवान जाधव आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.