कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथे राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा…

हेमकांत गायकवाड

महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला शस्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथे राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ ए एल चौधरी, उपप्राचार्य एन एस कोल्हे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ पी के लभाने, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री.विशाल हौसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ पी के लभाने यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना उद्दिष्टे व त्याअंतर्गत राबविण्यात येणारे कार्यक्रम यांची माहिती दिली. तसेच विद्यापीठाच्या उपक्रमांतर्गत वाचन कट्टा चे नियोजन व अंमलबजावणी केल्याची माहिती मान्यवरांना दिली. स्वयंसेवक मोहिनी खैरनार या विद्यार्थिनी सुरुवातीला रासेयो गीत गाऊन कार्यक्रम कार्यक्रमाची सुरुवात केली. याप्रसंगी रासेयो स्वयंसेवक यश महाजन, भाग्यश्री खैरनार, स्नेहल लोहार, ज्ञानेश्वर जोशी, रोहित रायसिंग त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना व त्यांचे अनुभव याबद्दल मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना चे जीवनातील महत्त्व यामुळे होणारा सर्वांगिन विकास याबद्दल आपले विचार मांडले. तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. ए एल चौधरी यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले आपल्या मनोगत व्यक्त करताना त्यांनी एनएसएस बद्दल व्यक्तिगत अनुभव सांगत एन एस एस चे जीवनातील महत्व व योगदान पटवून दिले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एन एस कोल्हे यांनी एन एस एस मध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करत असताना आलेले अनुभव विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय एकेकाचे स्वतंत्र यूट्यूब चैनल चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता बोरसे या रासेयो स्वयंसेविकेने केले व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री विशाल हौसे यांनी देखील आपल्या विद्यार्थी दशेतील अनुभव सांगत असताना राष्टीय सेवा योजनेचे व्यक्तिमत्वात असणारे योगदान सांगत सर्व उपस्थितांचे आभार मानले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयात करण्यात आले होते.