प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील स्मशानभूमीची दयनीय अवस्था झालेली होती. याबाबत पत्रकार जितेंद्र काटे यांनी बातम्या टाकून ग्रामस्थांच्या समस्या मांडल्या होत्या. त्यामुळे आधी ग्रामसेविका व प्रशासक यांनी बातम्यांची दखल घेत जेसीबी मशीन ने स्मशानभूमी रस्ता व महिलांच्या शौचालयाच्या परिसराची साफसफाई केली होती. परंतु स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे व गवत वाढलेले होते. त्यामुळे एखादी व्यक्ती मयत झाल्यावर अंत्यसंस्कारासाठी बाहेर गावाहून आलेली पाहुणे मंडळी स्मशानभूमीची परिस्थिती पाहून टिंगल टवाळी करत होते त्यामुळे पत्रकार जितेंद्र काटे यांनी बातम्या टाकून सत्य परिस्थिती मांडली. त्यामुळे सुनसगाव येथील नवनिर्वाचित सरपंच पती व काही सदस्यांनी स्मशानभूमीत असलेली काटेरी झुडपे व इतर घाण साफ केली. त्यामुळे नवनिर्वाचित महिला सरपंच पती व नवनिर्वाचित सदस्य यांचे कौतुक केले जात आहे. आणि विकासाची ही परंपरा कायम सुरू ठेवावी असे बोलले जात आहे.