चुंचाळे-बोराळे गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा भीम आर्मी ची मागणी,ग्रामपंचायतींना दिले निवेदन

दिपक नेवे

यावल – तालुक्यातील चुंचाळे बोराळे परिसरात वाढते चोरीचे सत्र बघता सी.सी.टी. व्ही. बसवावे असे भीम आर्मी मार्फत दोन्ही गावाच्या ग्रामपंचायतींना निवेदन देण्यात आले आहे त्यांनी निवेदनात म्हटले आहे की,यावल तालुक्यातील चुंचाळे-बोराळे येथे गावच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असल्याने परिसरातील रहिवासी व शेतकरी बांधवांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मोठे आर्थिक नुकसान झाल्याने सदर परिवारांच्या समोर एक संकट ठाकले होते आणि ते दिसून आले.

तसेच अश्या घटना पुन्हा घडू नये म्हणून आपण उपाययोजना राबावाव्या कारण मागील गेल्या एक ते दोन महिन्यांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे परंतु प्रशासन तपास लावण्यात अपयशी ठरल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

तरी सदर घटनेचे गंभीर्य ओळखून नागरिकांच्या मनातील भीती लक्षात घेऊन आपण स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चोऱ्या रोखण्यासाठी योग्य ते उपाय राबवून सी.सी.टी.व्ही. कॅमेरे दोघे गावात बसवावे,व सदर निवेदनाची प्रत आपल्या मार्फत

गटविकास अधीकारी यावल व जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव यांच्या पर्यंत पाठवून मागणीची पूर्तता करावी असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

हे निवेदन १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वतंत्र दिनचे औचित्य साधून देण्यात आले आहे,हे निवेदन देते वेळेस भीम आर्मी राज्य सचिव सुपडू संदानशिव,यावल तालुका कोषाध्यक्ष शिवाजी गजरे,शाखा सदस्य राजू वानखेडे,राहुल गजरे,प्रवीण सावळे व मिथुन गजरे आदी उपस्थित होते.